स्वातंत्र्य दिनी नाशिक विभागातील या १३ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा विशेष गौरव... उत्कृष्ट कामगिरीची दखल...

Share:
Main Image
Last updated: 14-Aug-2026

दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) १४ ऑगस्ट - महसूल विभागात उत्कृष्ट आणि उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या नाशिक विभागातील १३ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आगामी स्वातंत्र्यदिनी, म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी मुख्य शासकीय समारंभात विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. १ ऑगस्ट २०२५ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत महसूल प्रशासनात बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन या पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली आहे.

नाशिक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या सर्व १३ कर्मचाऱ्यांची निवड केली. या समितीत अपर आयुक्त (महसूल) जितेंद्र वाघ, अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) अरविंद लोखंडे, उपायुक्त (पुरवठा) प्रशांत काळे आणि अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील या सदस्यांचा समावेश होता.

पुरस्कारप्राप्त अधिकारी व कर्मचारी:

अपर जिल्हाधिकारी: धनंजय गोगटे

उपजिल्हाधिकारी: विजयकुमार ढगे

तहसीलदार: विशाल सोनवणे

नायब तहसीलदार: पूजा अवघडे

लघुलेखक: नितीन पुंडलिक बागुल

Advertisement

सहायक महसूल अधिकारी: दत्तात्रय अनिल गंधाडे

मंडळ अधिकारी: सोनाली बाबूराव कोल्हे

महसूल सहायक: गुणवंत पाटील

ग्राम महसूल अधिकारी: महेंद्र प्रकाश शिंदे

वाहनचालक: यशवंत वाघ

शिपाई: सलीम रज्जाक शेख

महसूल सेवक: डोंगर माळीच

पोलीस पाटील: सुभाष निकुंभे

स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यानंतर या पुरस्कारांचे औपचारिक वितरण केले जाईल. महसूल प्रशासनाच्या विविध स्तरांवर काम करताना दाखवलेली कार्यक्षमता आणि निष्ठा यांमुळे हा सन्मान दिला जात असून, यामुळे इतर कर्मचाऱ्यांनाही उत्कृष्ट कामाची प्रेरणा मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Advertisement

Comments

No comments yet.