कुंभमेळा आपत्ती व्यवस्थापन... NDRF व SDRF कडून घाटांची संयुक्त पाहणी...

Share:
Main Image
Last updated: 13-Aug-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) १३ ऑगस्ट - सिंहस्थ कुंभमेळा २०२७ मधील भाविकांची संभाव्य अथांग गर्दी आणि सुरक्षेचे आव्हान लक्षात घेता नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने प्रत्यक्ष मैदानावर आपत्ती प्रतिसाद व्यवस्थेचा ‘ग्राउंड चेक’ सुरू केला आहे. याअंतर्गत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेऊन नाशिक व त्र्यंबकेश्वरमधील मुख्य घाटांची संयुक्त पाहणी करण्यात आली.

समीक्षा बैठक आणि रणनीती

कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत NDRF (पुणे) चे कमांडंट संतोष बहादूर सिंह व SDRF (धुळे) चे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मुख्यत्वे खालील मुद्द्यांवर नियोजन करण्यात आले:

कमीत कमी प्रतिसाद वेळ: आपत्कालीन प्रसंगी बचाव पथके घटनास्थळी लवकरात लवकर कशी पोहोचतील यासाठी विशेष प्रवेशमार्ग (Emergency Corridors) आणि स्टेजिंग एरिया निश्चित करणे.

जोखीम व्यवस्थापन: जल बचाव, चेंगराचेंगरीसारख्या आपत्कालीन परिस्थिती आणि मोठ्या प्रमाणातील जीवितहानी टाळण्यासाठी उपाययोजना आखणे.

संसाधने व सराव: आवश्यक मनुष्यबळ, वाहने व उपकरणांचा आढावा घेऊन लवकरच प्रात्यक्षिके (Mock Drills) आणि संयुक्त सराव आयोजित करणे.

Advertisement

घाटांची प्रत्यक्ष पाहणी

बैठकीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील महत्त्वाच्या घाटांची पाहणी केली:

नाशिक: दसक गंगाघाट, कपिला संगम, नंदिनी संगम, रामकुंड आणि सोमेश्वर घाट.

त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वर घाट परिसर.

"कुंभमेळ्यापूर्वी संभाव्य जोखमींची प्रत्यक्ष जागेवर जाऊन ओळख करणे आणि त्यानुसार सर्व यंत्रणांमध्ये समन्वय निर्माण करून आपत्ती प्रतिसाद क्षमता वाढवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे."

— शेखर सिंह (आयुक्त, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण)

Advertisement

Comments

No comments yet.