नाशिक शहर पोलीस दलात फेरबदल सुरूच... आणखी तीन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या...

Share:
Main Image
Last updated: 12-Aug-2026

एस.के. खेडकर, (नाशिक) १२ ऑगस्ट - शहर पोलीस दलातील प्रशासकीय निकड आणि कायदा-सुव्यवस्थेच्या कारणास्तव पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पुन्हा एकदा मोठे फेरबदल केले आहेत. गेल्या काही दिवसांत पोलीस आयुक्तांकडून तिसऱ्यांदा असा बदल्यांचा धक्का देण्यात आला असून, या नव्या आदेशानुसार तीन पोलीस निरीक्षकांच्या तात्पुरत्या स्वरूपात नवीन ठिकाणी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

याबाबत पोलीस आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत आदेशानुसार (क्रमांक: ७४२७/२०२६, दिनांक १२ ऑगस्ट २०२६), महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदींनुसार हे फेरबदल तातडीने लागू करण्यात आले आहेत.

अशा झाल्या नव्या नियुक्त्या:

पोनि. रामदास राजाराम शेळके: आर्थिक गुन्हे शाखेतून प्रभारी अधिकारी, नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम).

Advertisement

पोनि. जगवेंद्रसिंग नवलसिंग राजपूत: उपनगर पोलीस ठाण्यातून प्रभारी अधिकारी, आर्थिक गुन्हे शाखा.

पोनि. संजय मारूती पिसे: शहर वाहतूक शाखा (सातपूर-एक्सप्लो युनिट) मधून प्रभारी अधिकारी, उपनगर पोलीस ठाणे.

तत्काळ हजर होण्याचे आदेश

संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी तात्पुरत्या कामकाजाच्या ठिकाणी पदभार स्वीकारण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त व्हावे आणि नियुक्तीच्या ठिकाणी हजर होऊन तसा अनुपालन अहवाल पोलीस आयुक्त कार्यालयाकडे सादर करावा, असे स्पष्ट निर्देश या आदेशात देण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पोलीस आयुक्तांकडून सातत्याने सुरू असलेल्या या फेरबदलांमुळे पोलीस वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि पोलीस प्रशासनाला अधिक गती देण्यासाठी हे अंतर्गत बदल केले जात असल्याचे समजते.

Advertisement

Comments

No comments yet.