नाशिक, रायगड, पुण्यात कोण ध्वजारोहण करणार? राज्य सरकारने जारी केले हे आदेश...

Share:
Main Image
Last updated: 12-Aug-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १२ ऑगस्ट - भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह राज्यभरात शिगेला पोहोचला असून राज्य शासनाकडून १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचा मुख्य शासकीय सोहळा मुंबईतील 'मंत्रालय' येथे पार पडणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी ८:०५ वाजता ध्वजारोहण केले जाईल. तर पुणे येथील जिल्हा मुख्यालयात राज्याचे राज्यपाल ध्वज फडकावणार आहेत.

स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यातील विविध जिल्ह्यांत होणाऱ्या ध्वजारोहणासाठी मंत्र्यांची व लोकप्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे. रायगडमध्ये भरत गोगावले, तर नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न होणार आहे.

जिल्हा मुख्यालयानुसार ध्वजारोहण करणाऱ्या मान्यवरांची संपूर्ण यादी:

ठाणे: एकनाथ संभाजी शिंदे

पुणे: राज्यपाल

नागपूर: चंद्रशेखर बावनकुळे

अहिल्यानगर: राधाकृष्ण विखे-पाटील

नाशिक: गिरीश महाजन

रायगड: भरत गोगावले

बीड: सुनेत्रा पवार

छत्रपती संभाजीनगर: संजय शिरसाट

मुंबई उपनगर: आशिष शेलार

कोल्हापूर: प्रकाश आबीटकर

सांगली: चंद्रकांत (दादा) पाटील

सातारा: शंभूराज देसाई

सोलापूर: जयकुमार गोरे

अमरावती: दादाजी भुसे

जळगाव: गुलाबराव पाटील

धुळे: जयकुमार रावल

Advertisement

नंदुरबार: हसन मुश्रीफ

पालघर: गणेश नाईक

रत्नागिरी: उदय सामंत

सिंधुदुर्ग: नितेश राणे

नांदेड: अतुल सावे

लातूर: शिवेंद्रसिंहराजे भोसले

धाराशिव: प्रताप सरनाईक

जालना: पंकजा मुंडे

परभणी: मेघना बोर्डीकर

हिंगोली:  नरहरी झिरवाळ

यवतमाळ: संजय राठोड

अकोला: आकाश फुंडकर

बुलढाणा: मकरंद जाधव (पाटील)

वाशिम: दत्तात्रय भरणे

चंद्रपूर: डॉ. अशोक बुडके

गडचिरोली: आशिष जयस्वाल

भंडारा: माधुरी मिसाळ

गोंदिया: इंद्रनील नाईक

वर्धा: डॉ. पंकज भोयर

स्वातंत्र्यदिनाच्या या अमृतमयी सोहळ्यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्व तयारी पूर्ण झाली असून सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी विविध सांस्कृतिक आणि देशभक्तीपर कार्यक्रमांचेही नियोजन करण्यात आले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.