नाशिक, (प्रतिनिधी) १२ ऑगस्ट - हृदयविकाराच्या अत्यंत गंभीर समस्यांनी ग्रस्त असलेल्या, ज्यांना इतर डॉक्टरांनी बायपास सर्जरीचा सल्ला दिला आहे किंवा ज्यांच्याबाबत ‘अँजिओप्लास्टी होऊ शकत नाही’ असे सांगण्यात आले आहे, अशा रुग्णांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. एसएमबीटी हॉस्पिटल, नंदी हिल्स, ता. इगतपुरी येथील एसएमबीटी हॉस्पिटल आणि एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूट यांच्या वतीने १३ ते १५ ऑगस्ट २०२६ दरम्यान 'मोफत कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टी शिबिराचे' आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत पार पडणार असून, 'आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजने'अंतर्गत पात्र रुग्णांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.
या तीन दिवसीय शिबिरामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कार्डियाक उपचार तज्ज्ञ डॉ. व्ही. सूर्यप्रकाश राव (संस्थापक, इंडो-जपानीज सीटीओ क्लब) आणि एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर व वरिष्ठ हृदयविकार तज्ज्ञ डॉ. गौरव वर्मा हे रुग्णांची तपासणी करून अँजिओप्लास्टी करणार आहेत तसेच उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
अनेकदा रुग्णांना तीनही धमन्यांमध्ये ब्लॉक (Triple Vessel Disease - TVD) असणे, १००% जुने ब्लॉक असणे (CTO), किंवा आधी अँजिओप्लास्टी करण्याचा प्रयत्न अपयशी ठरलेला असणे अशा परिस्थितीला सामोरे जावे लागते. अशा वेळी बहुतेक ठिकाणी थेट बायपासचाच सल्ला दिला जातो. मात्र, या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या जटिल आणि गुंतागुंतीच्या अँजिओप्लास्टी आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अत्यंत सुरक्षितपणे पार पाडल्या जाणार आहेत. त्यामुळे बायपास टाळू इच्छिणाऱ्या आणि उपचाराची आशा सोडलेल्या रुग्णांसाठी हे शिबिर अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.
या शिबिरामध्ये क्रॉनिक टोटल ऑक्लुजन (CTO) अँजिओप्लास्टी, सर्व प्रकारच्या जटिल व गुंतागुंतीच्या अँजिओप्लास्टी, लेफ्ट मेन व बायफर्केशन अँजिओप्लास्टी, रोटेशनल ॲथरेक्टॉमी (Rotablation), IVUS व OCT इमेजिंग तंत्रज्ञान, तसेच हार्ट अटॅकदरम्यान तातडीने केली जाणारी 'प्रायमरी पीसीआय' (Primary PCI) यांसारख्या अत्याधुनिक सुविधांचा समावेश आहे.
शिबिरासंदर्भात अधिक माहिती व नावनोंदणीसाठी आकाश सगळे (मो. ७७४४९१३९१३) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच एसएमबीटी हॉस्पिटल, नंदी हिल्स (ता. इगतपुरी, जि. नाशिक - 0253 694 0000) येथे भेट देण्याचे आवाहन एसएमबीटी हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.
बायपास टाळणाऱ्यांसाठी 'कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टी' ठरणार वरदान
आमच्याकडे होणाऱ्या या शिबिरात अतिगुंतागुंतीच्या हृदयविकारांवर उपचार केले जाणार आहेत. ज्या रुग्णांना इतर ठिकाणी अँजिओप्लास्टी अशक्य सांगून बायपासचा सल्ला दिला आहे, मात्र रुग्ण बायपाससाठी सक्षम नाही, अशांवर येथे 'कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टी' केली जाईल. एसएमबीटीमध्ये अशा अँजिओप्लास्टी नेहमीच होतात; मात्र या शिबिरासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉ. व्ही. सूर्यप्रकाश राव उपस्थित राहणार आहेत. याचा फायदा रेफर केलेल्या रुग्णांना तर होईलच, शिवाय स्थानिक डॉक्टरांसाठीही कार्यशाळेच्या माध्यमातून शिकण्याची ही मोठी पर्वणी आहे.
- डॉ. गौरव वर्मा, डायरेक्टर व वरिष्ठ हृदयविकार तज्ज्ञ, एसएमबीटी
सर्व अत्याधुनिक यंत्रणा आणि आयसीयू बॅकअप उपलब्ध
अशा प्रकारच्या अँजिओप्लास्टी खूप गुंतागुंतीच्या असतात. यासाठी एसएमबीटीमध्ये सर्व प्रकारची आधुनिक साधनसामग्री उपलब्ध आहे. आमच्याकडे कार्डियाक आयसीयूचा भक्कम बॅकअप, अल्ट्रा मॉड्युलर कॅथलॅब आणि २४ तास तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सेवेत असते. त्यामुळे अत्यवस्थ किंवा हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या रुग्णांवरही सहज व सुलभ उपचार शक्य आहेत
सचिन बोरसे (डायरेक्टर - हेल्थकेअर, एसएमबीटी हॉस्पिटल
ही लक्षणे असतील तर शिबिरात सहभागी व्हा
* छातीत दुखणे किंवा जळजळ होणे
* छातीवर अचानक भार वाटणे
* चालताना जास्त दम लागणे
* अचानक दरदरून घाम येणे
* डाव्या बाजूच्या जबड्याला वेदना होणे
* डाव्या हाताला मुंग्या येणे व वेदना होणे
अशी लक्षणे दिसल्यास रुग्णांनी या शिबिराचा आवर्जून लाभ घ्यावा.