सिन्नर, (प्रतिनिधी) १२ ऑगस्ट - भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) सिन्नर-शिर्डी दरम्यानच्या (रा. म. क्र. १६०) पिंपरवाडी टोल प्लाझा येथे १३ ऑगस्ट २०२६ पासून सुधारित पथकर (टोल) दर लागू करण्याची घोषणा केली आहे. या टोल प्लाझावरून प्रवास करणाऱ्या विविध प्रकारच्या वाहनांसाठी नवीन दरपत्रक जाहीर करण्यात आले असून, सर्व व्यवहार फक्त फास्टॅगद्वारेच (Fastag) स्वीकारले जाणार आहेत.
वाहननिहाय सुधारित दरांचा तक्ता असा
अवजड वाहन (७ किंवा अधिक ॲक्सल)
टोलमधील महत्त्वाच्या सवलती व नियम:
स्थानिकांसाठी मासिक पास: टोल नाक्यापासून २० किमी परिसरातील अव्यावसायिक स्थानिकांच्या वाहनांसाठी २०२६-२७ या वर्षाकरिता रु. ३६०/- चा मासिक पास उपलब्ध असेल.
परतीचा प्रवास: टोल भरल्यापासून २४ तासांच्या आत परतीचा प्रवास केल्यास २५% सूट मिळेल.
मासिक पास सवलत: महिन्यात ५० एकेरी फेऱ्या करणाऱ्या वाहनांना ३३% सूट लागू राहील.
वार्षिक पास सुविधा: बिगर व्यावसायिक वाहनांना रु. ३०७५/- भरून 'राजमार्ग यात्रा' ॲपवरून एका वर्षासाठी (किंवा २०० वेळा क्रॉसिंगसाठी) वार्षिक पासची सुविधा उपलब्ध आहे.
व्यावसायिक वाहनांना ५०% सूट: पर्यायी रस्ता/सर्व्हिस रोड उपलब्ध नसलेल्या ठिकाणी जिल्ह्यातील नोंदणीकृत व्यावसायिक वाहनांना निर्धारित दराच्या ५०% दराने दर आकारले जातील.
फास्टॅग नसेल तर दुप्पट दंडात्मक आकारणी:
सर्व महामार्गांवर फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या वाहनांवर वैध आणि कार्यरत फास्टॅग नसेल किंवा पुरेशी शिल्लक नसेल, अशा वाहनांकडून त्या श्रेणीसाठी लागू असलेल्या टोल दराच्या दुप्पट रक्कम दंड म्हणून वसूल केली जाईल. तसेच, क्षमतेपेक्षा जास्त भार (ओव्हरलोड) घेऊन जाणाऱ्या वाहनांकडून निर्धारित शुल्काच्या १० पट पर्यंत अधिभार वसूल केला जाऊ शकतो.