निमाणी बसस्थानकात विद्यार्थिनीची... गर्दीचा फायदा घेत...

Share:
Main Image
Last updated: 11-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ११ ऑगस्ट - घरी जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना गर्दीची संधी साधून एका विद्यार्थिनीची ६५ हजार ४०० रुपयांचा ऐवज असलेली लॅपटॉप बॅग अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना निमाणी बसस्थानकात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मूळची अक्कलकुवा (जि. नंदुरबार) येथील रहिवासी असलेली पीडित विद्यार्थिनी नाशिक शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहे.

नेमकी घटना काय?

Advertisement

सुट्टीसाठी गावी निघताना चोरी: महाविद्यालयाला सुट्टी असल्याने शनिवारी (दि. ८) दुपारी ही विद्यार्थिनी गावी जाण्यासाठी निमाणी बसस्थानकात आली होती.

गर्दीचा फायदा घेतला: अक्कलकुवा बसमध्ये चढत असताना बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी तिच्या ट्रॉली बॅगेला लटकवलेली लॅपटॉप बॅग शिताफीने पळवली.

६५ हजारांचा ऐवज गायब: पळवलेल्या बॅगेत ५ हजार रुपयांची रोकड, लॅपटॉप, मोबाईल चार्जर, पॉवर बँक आणि महत्त्वाची कागदपत्रे असा एकूण ६५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल होता.

बॅग चोरीला गेल्याचे लक्षात येताच विद्यार्थिनीने पंचवटी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार कैलास शिंदे करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.