TCS प्रकरण... नगरसेवक मतीन पटेलला नाशिक पोलिसांकडून अटक...

Share:
Main Image
Last updated: 07-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ७ ऑगस्ट - बहुचर्चि‍त TCS प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला पोलिसांपासून लपवण्यासाठी स्वतःच्या घरात आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएम (AIMIM) पक्षाचा नगरसेवक मतीन पटेल याच्या अखेर नाशिक पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. नाशिक पोलीस दलाच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर येथून त्याला शिताफीने अटक केली. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करत फरार आरोपीला मदत करणे मतीन याच्या अंगलट आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, TCS प्रकरणात मुख्य आरोपी असलेली निदा खान ही गुन्हा घडल्यापासून फरार होती. पोलीस तिचा कसून शोध घेत असताना नगरसेवक मतीन पटेल याने तिला स्वतःच्या निवासस्थानी लपवून ठेवल्याचे आणि पोलिसांची दिशाभूल करून तपासात अडथळा आणल्याचे निष्पन्न झाले होते. न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही आरोपीला कायदेशीर कारवाईपासून वाचवण्यासाठी आश्रय दिल्याप्रकरणी मतीनवर न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

Advertisement

या कारवाईनंतर मतीन पटेल हा देखील नाशिकमधून फरार झाला होता. तो छत्रपती संभाजीनगरमध्ये लपून बसल्याची गुप्त माहिती नाशिक पोलिसांना मिळताच, पथकाने तेथे छापा मारून त्याला ताब्यात घेतले. या अटकेमुळे राजकीय वर्तुळात आणि गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस आता त्याची सखोल चौकशी करत आहेत.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.