नाशिक, (प्रतिनिधी) ६ ऑगस्ट - शहर पोलीस आयुक्तालयात प्रशासकीय कारणास्तव चार पोलीस निरीक्षकांच्या तात्पुरत्या स्वरूपात बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत. शहर वाहतूक शाखा आणि प्रमुख पोलीस ठाण्यांच्या कामकाजात गती व सुसूत्रता आणण्यासाठी हे बदल करण्यात आल्याचे समजते.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नवी नियुक्ती पुढीलप्रमाणे:
सुरेश आव्हाड: सरकारवाडा पोलीस ठाण्यातून गंगापूर पोलीस ठाणे (प्रभारी अधिकारी)
युवराज पत्की: शहर वाहतूक शाखा, युनिट क्र. २ येथून सरकारवाडा पोलीस ठाणे (प्रभारी अधिकारी)
अशोक शरमाळे: गंगापूर पोलीस ठाण्यातून शहर वाहतूक शाखा, युनिट क्र. २ (प्रभारी अधिकारी)
संजय पिसे: नियंत्रण कक्षातून शहर वाहतूक शाखा, सातपूर-एक्सलो युनिट (प्रभारी अधिकारी, तात्पुरती नियुक्ती)
आदेश जारी होताच संबंधित सर्व अधिकाऱ्यांना तातडीने आपापल्या नवीन पदाचा पदभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.