पेट्रोल पंपावरील कामगारांचा मालकालाच ४४ लाखांचा गंडा... असे झाले उघड...

Share:
Main Image
Last updated: 05-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ५ ऑगस्ट - विश्वासू कर्मचाऱ्यांनीच मालकाचा विश्वासघात करत तब्बल ४४ लाख ३२ हजार रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. हिशोबात आणि कागदपत्रांमध्ये फेरफार करून हा अपहार करण्यात आला असून, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात संशयित कामगारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानेश्वर गुंबाडे, सुनील वाघमारे, रोहित उर्फ अंकुश फसाळे, गोकुळ जाधव आणि इतर कामगार (सर्व रा. दात्याने, ता. निफाड) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी पुष्कर देवेंद्र शिंदे (रा. कामगारनगर, सातपूर) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Advertisement

प्रकरणाची पार्श्वभूमी व अपहाराची पद्धत
पेट्रोल पंप व संशयित: तक्रारदार पुष्कर शिंदे यांचा आडगाव शिवारातील 'नववा मैल' भागात भारत पेट्रोलियम कंपनीचा (BPCL) पेट्रोल पंप आहे. या पंपावर संशयित १ एप्रिल २०२४ पासून कार्यरत होते.

असा उघडकीस आला घोटाळा: संशयितांनी १ एप्रिल २०२४ पासूनच्या दैनंदिन हिशोबात जाणीवपूर्वक गोंधळ घातला. कार्ड मशीनच्या पावत्या (POS Machine Slips), बँकेचे स्टेटमेंट आणि ग्राहकांच्या उधारी नोंदींची पडताळणी केली असता एकूण ४४ लाख ३२ हजार ५५६ रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचे मालकाचा लक्षात आले.

पोलीस कारवाई: स्वतःच्याच कर्मचाऱ्यांनी लाखोंचा अपहार केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर शिंदे यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली.
आडगाव पोलिसांनी सर्व संशयित कामगारांविरोधात गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक बोंडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.