कुंभमेळा आढावा बैठक... या कारणांवरून गाजली...

Share:
Main Image
Last updated: 02-Aug-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) २ ऑगस्ट - नाशिक येथे होणाऱ्या आगामी 'सिंहस्थ कुंभमेळा-२०२७' च्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेमार्फत सुरू असणारी सर्व पायाभूत विकासकामे ठरवून दिलेल्या कालमर्यादेत आणि उच्च दर्जाने पूर्ण करावीत. कामांचा दर्जा राखताना नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन सर्व विभागांनी समन्वयाने कामे गतिमान करावीत, असे स्पष्ट आणि कडक निर्देश जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या नाशिक येथील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत मंत्री बोलत होते. यावेळी आमदार गोकुळ गिते, देवयानी फरांदे, महापौर हिमगौरी आडके-आहेर, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, मनपा आयुक्त मनिषा खत्री आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

रस्ते विकासाला सर्वोच्च प्राधान्य; खड्डे बुजवण्याचे तातडीचे आदेश

शहरातील रस्ते विकासकामांबाबत बोलताना मंत्री महाजन यांनी सांगितले की:

रस्त्याच्या एका बाजूचे काम पूर्ण होताच तो भाग तात्काळ वाहतुकीसाठी खुला करावा आणि दुसऱ्या बाजूचे काम समांतरपणे सुरू ठेवावे.

पावसाळ्यातही शक्य तिथे कामे सुरू ठेवावीत. खड्डे बुजवणे, साईडपट्ट्या पूर्ववत करणे आणि वाहतूक सुरळीत ठेवण्याकडे लक्ष द्यावे.

विशेषतः द्वारका सर्कल, काठे गल्ली, त्र्यंबक रोड आणि सातपूर परिसरातील खड्डे बुजवून वाहतूक सुरक्षित करावी.

कंत्राटदारांवर कारवाई: कामात विलंब किंवा निकृष्ट दर्जा अजिबात सहन केला जाणार नाही. अटींचे पालन न करणाऱ्या कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

Advertisement

१,५०० अत्याधुनिक सीसीटीव्ही अन् हाय-टेक सुरक्षा

मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी कुंभमेळ्याच्या तयारीचे सादरीकरण करताना शहरातील विविध विकासकामांची प्रगती मांडली:

सीसीटीव्ही व नेटवर्क: शहरात २६५ किमीचे ऑप्टिकल फायबर नेटवर्क पूर्ण झाले आहे. या नेटवर्कद्वारे १,५०० अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले जातील, ज्यामुळे गर्दी आणि वाहतूक नियंत्रणावर थेट नजर ठेवता येईल.

रस्ते आणि पुलांची कामे: प्रमुख सिमेंट काँक्रीट रस्त्यांची एका बाजूची कामे पूर्ण झाली आहेत. गंगापूर फाटा, अंबड, राजीव गांधी मार्ग आणि त्र्यंबक रोडवरील भूमिगत युटिलिटीची कामे ऑगस्ट अखेरपर्यंत पूर्ण होतील.

इतर प्रकल्प: संत गाडगे महाराज पुलासह नदीपात्रातील पायाभूत कामे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) आणि सिव्हरेज नेटवर्कची कामे वेगाने सुरू आहेत.

"वेळेत मंजुरी अन् कालबद्ध नियोजन!"

"प्रशासकीय मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या सर्व प्रकल्पांना त्वरित गती देऊन निविदा प्रक्रिया पूर्ण कराव्यात. कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांसाठी डीपीआर (DPR) सादर करावा. सर्व विभागांनी कालबद्ध नियोजनानुसार कामे सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वीच पूर्ण करावीत."

— गिरीश महाजन, जलसंपदा व कुंभमेळा मंत्री

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.