नाशकात महिला अन् मुली असुरक्षित... दोन युवतींचा विनयभंग...

Share:
Main Image
Last updated: 01-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १ ऑगस्ट - शहरात महिला आणि युवतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अनोळखी व्यक्तींपेक्षा परिचितांकडूनच महिला-मुली असुरक्षित असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. रस्त्याने पायी जाणाऱ्या दोन युवतींचा शुक्रवारी (दि. ३१) वेगवेगळ्या घटनांमध्ये विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भद्रकाली आणि अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली घटना: 'तुझे मेरे साथ रहेना पडेगा' म्हणत रस्ता अडवला

जुने नाशिक परिसरात राहणारी पीडित तरुणी शुक्रवारी दुपारी मुलतानपुरा भागातून पायी जात होती. या वेळी आबिद नवाज नगिनेवाले (रा. घर नं. २८०१, फुले मार्केटसमोर, दखनीपुरा) याने तिचा पाठलाग केला. जहागीर कब्रस्तानासमोर तरुणीची वाट अडवून संशयिताने "तुझे मेरे साथ रहेना पडेगा," असे म्हणत जबरदस्ती करत तिचा विनयभंग केला. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आरिफ सय्यद करत आहेत.

Advertisement

दुसरी घटना: सिडकोत फोटो व्हायरल करण्याची धमकी; आयटी ॲक्टनुसार गुन्हा

दुसरी घटना सिडको परिसरात घडली असून, ती प्रेमप्रकरणातून घडल्याचे समोर आले आहे. पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, सागर पुंडलिक हिरे हा तरुण तिला सतत मानसिक त्रास देत होता. तरुणीने फोनवर बोलण्यास नकार दिल्यानंतरही तो मेसेज आणि व्हॉट्सॲप चॅटिंगद्वारे 'रिलेशनशिप'मध्ये राहण्यासाठी दबाव टाकत होता. शुक्रवारी सायंकाळी संशयिताने तरुणीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची आणि तिच्या दुकानावर येऊन गोंधळ घालण्याची धमकी दिली.

या त्रासाला कंटाळून तरुणीने थेट पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात विनयभंगासह 'आयटी ॲक्ट'नुसार (माहिती तंत्रज्ञान कायदा) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Advertisement

Comments

No comments yet.