ब्लिंकइटचा डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला... टोळक्याने बांबूने झोडपले...

Share:
Main Image
Last updated: 01-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १ ऑगस्ट - ऑनलाईन ऑर्डरची डिलिव्हरी देण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला टोळक्याने बांबूने बेदम मारहाण करत त्याचा मोबाईल जमिनीवर आपटून फोडल्याची धक्कादायक घटना त्र्यंबक रोडवरील पिंपळगाव शिवारात घडली. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

शिवम संदीप जायभावे (वय १८, रा. शिवाजीनगर) या तरुणाने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. शिवम हा 'ब्लिंकिट' (Blinkit) या कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. बुधवारी (दि. २९) रात्री तो एक ऑर्डर देण्यासाठी संदिप फाऊंडेशन या शिक्षण संस्थेत जात होता. पिंपळगाव शिवारातील नाला परिसरात पोहोचला असता एका अनोळखी तरुणाने त्याला हाक मारून मोबाईल मागितला.

शिवमने मोबाइल देण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे चिडलेल्या त्या तरुणाने "तू माघारी ये, तुला बघतोच," अशी धमकी दिली. परिस्थिती ओळखून शिवमने तेथून काढता पाय घेतला व कॉलेज गाठून ऑर्डर पूर्ण केली. मात्र, परतीच्या प्रवासात संशयित तरुण आणि त्याच्या ३ ते ४ साथीदारांनी शिवमची वाट अडवली. त्यांनी त्याला बांबूने बेदम मारहाण केली आणि त्याचा मोबाईल हिसकावून जमिनीवर आपटून फोडला. सातपूर पोलीस ठाण्याचे हवालदार बनकर या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.