कॉल करून बोलावले... तरुणावर शस्त्राने सपासप वार...

Share:
Main Image
Last updated: 01-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १ ऑगस्ट - प्रेमप्रकरणाच्या वादातून एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना पेठ रोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डाच्या मागे घडली. या प्रकरणी संशयित चंदन देशमुख याच्याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, साहिल नितीन व्यवहारे (वय २६, रा. मधुबन कॉलनी, मखमलाबाद रोड) याने याबाबत फिर्याद दिली आहे. संशयित चंदन देशमुख याने बुधवारी (दि. २९) सायंकाळी साहिलशी मोबाईलवर संपर्क साधला आणि त्याला पेठ रोडवरील शरदचंद्र मार्केट यार्डामागे भेटण्यासाठी बोलावून घेतले.

साहिल त्या ठिकाणी पोहोचताच, संशयिताने "तू प्रतिभाचा नाद सोड," असे म्हणत त्याच्याशी उगाच वाद घातला. वादाचे रूपांतर भांडणात होऊन संतप्त झालेल्या देशमाने याने साहिलला शिवीगाळ करत जमिनीवर पाडले आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता संशयिताने धारदार वस्तूने साहिलच्या खांद्याखाली वार करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडले. या घटनेत साहिल गंभीर जखमी झाला असून, पंचवटी पोलीस ठाण्याचे जमादार कुलकर्णी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.