कामातून उलगडणारा विश्वास... प्रभाग ३ मध्ये अंबादास खैरे यांचा झंझावात...

Share:
Main Image
Last updated: 11-Jan-2026

 

 

नाशिक, (प्रतिनिधी) दि. ११ जानेवारी २०२६ -  "शब्दांपलीकडचा विकास आणि कामातून उलगडणारा विश्वास" हे ब्रीदवाक्य घेऊन नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (महायुती) अधिकृत उमेदवार अंबादास खैरे यांनी प्रभाग क्रमांक ३ मध्ये प्रचाराचा धडाका लावला आहे. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कामातून जनतेचा विश्वास संपादन केल्याने, खैरे यांच्या प्रचार फेऱ्यांचे ठिकठिकाणी अभूतपूर्व स्वागत होत आहे.

कोविड काळातील 'देवदूत'

अंबादास खैरे यांचे सामाजिक कार्य प्रभागातील नागरिकांसाठी नवीन नाही. कोविडच्या अत्यंत कठीण काळात त्यांनी 'भुजबळ कोविड सेंटर'मध्ये रुग्णांना बेड आणि औषधे मिळवून देण्यासाठी अहोरात्र कष्ट उपसले.

  • लसीकरण मोहीम: मारुती मंदिर येथे विशेष केंद्र सुरू करून १० हजारांहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले.
  • अन्नदान: लॉकडाऊनमध्ये हातावर पोट असलेल्या ३ हजार गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप करून मोठा आधार दिला.

महिला भगिनींचा भक्कम पाठिंबा

महायुती सरकारच्या 'लाडकी बहीण' योजनेची अंमलबजावणी करण्यात खैरे यांनी आघाडी घेतली आहे. त्यांच्या संपर्क कार्यालयातून ३५०० हून अधिक महिलांचे अर्ज ऑनलाईन भरून देण्यात आले, तसेच त्यांचे केवायसी (KYC) देखील पूर्ण करून घेतले. या महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा व्हावेत, यासाठी त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे महिला वर्गात त्यांच्याबद्दल मोठी कृतज्ञता पाहायला मिळत आहे.

सुरक्षित आणि विकसित प्रभागाचा संकल्प

नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा करणे असो वा वेळप्रसंगी आंदोलन, अंबादास खैरे नेहमीच अग्रभागी राहिले आहेत. विशेषतः गणेशवाडी देवी मंदिर परिसर सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली आणून त्यांनी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लावला आहे, ज्याची दखल खुद्द पोलीस प्रशासनानेही घेतली आहे.

प्रचारातून दिसतोय विजयाचा विश्वास

प्रभाग ३ मधील नागरिकांच्या दैनंदिन समस्या प्रत्यक्ष जमिनीवर उतरून समजून घेणारे नेतृत्व म्हणून अंबादास खैरे यांची ओळख निर्माण झाली आहे. "विश्वास हा प्रचारातून नाही, तर कामातून मिळतो," हा त्यांचा ठाम विश्वास मतदारांच्या पसंतीस उतरत असून, त्यांच्या प्रचार फेरीला मिळणारा प्रतिसाद विजयाची ग्वाही देत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

 

Comments

No comments yet.