नाशकात सुरू होणार 'नेक्स्ट जनरेशन पोस्ट ऑफिस'... काय आहेत त्याची वैशिष्ट्ये?

Share:
Main Image
Last updated: 22-Jul-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) २२ जुलै - भारतीय टपाल विभागाच्या नाशिक विभागातर्फे तरुणाईच्या, विशेषतः 'जेन झी' (Gen Z) च्या आधुनिक गरजा आणि अपेक्षा लक्षात घेऊन 'नेक्स्ट जनरेशन पोस्ट ऑफिस' ही नवीन संकल्पना साकारण्यात आली आहे. या अत्याधुनिक पोस्ट ऑफिसचे औपचारिक उद्घाटन शुक्रवार, २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता संदीप युनिव्हर्सिटी, नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती नाशिक विभागाचे वरीष्ठ टपाल अधीक्षक प्रफुल्ल वाणी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

देशभरात १०० 'नेक्स्ट जनरेशन' पोस्ट ऑफिस कार्यान्वित

टपाल विभाग केवळ पारंपरिक सेवांपुरता मर्यादित न राहता नागरिकांसाठी, विशेषतः नवीन पिढीसाठी विविध नावीन्यपूर्ण योजना आणि सुविधा राबवत आहे. डिजिटल युगातील तरुणांना टपाल सेवांकडे आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना गतिमान सुविधा पुरवण्यासाठी टपाल विभागाने देशभरात १०० 'नेक्स्ट जनरेशन पोस्ट ऑफिस' यशस्वीरीत्या कार्यान्वित केली आहेत. याच मालिकेत आता नाशिकचाही समावेश होत आहे.

उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण

Advertisement

शुभहस्ते: सुचिता जोशी (पोस्ट मास्टर जनरल, नवी मुंबई क्षेत्र, पनवेल)

प्रमुख उपस्थिती: डॉ. संदीप झा (अध्यक्ष, संदीप युनिव्हर्सिटी, नाशिक)

वेळ व ठिकाण: शुक्रवार, २४ जुलै २०२६ | सकाळी ११:३० वाजता | संदीप युनिव्हर्सिटी कॅम्पस, नाशिक

उपस्थित राहण्याचे आवाहन:

"टपाल विभागाचे हे आधुनिक रूप नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आले आहे. संदीप युनिव्हर्सिटीत होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्यास विद्यार्थी, नागरिक आणि टपाल सेवा प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे," असे आवाहन वरीष्ठ अधीक्षक प्रफुल्ल वाणी यांनी केले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.