हायवेवरील मोबाईल नेटवर्कची झाली पोलखोल... महाराष्ट्रात येथे आहे अतिशय भंगार नेटवर्क...

Share:
Main Image
Last updated: 17-Jul-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १७ जुलै - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि पुणे ते पणजी दरम्यानच्या महामार्गावरील मोबाईल नेटवर्कची नेमकी स्थिती काय आहे? कॉल ड्रॉप का होतात आणि डेटा स्पीड का घसरतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) थेट रस्त्यावर उतरून 'रियालिटी चेक' केला आहे. ट्रायच्या बेंगळुरू प्रादेशिक कार्यालयाच्या देखरेखीखाली 'महाराष्ट्र एलएसए' (Licensed Service Area) अंतर्गत घेण्यात आलेल्या या स्वतंत्र ड्राईव्ह टेस्टचे (Independent Drive Test) अधिकृत निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. दूरसंचार कंपन्यांच्या सेवेचा दर्जा सुधारणे आणि ग्राहकांना वास्तववादी माहिती देणे हा या चाचणीमागील मुख्य उद्देश आहे. १४ एप्रिल ते १७ एप्रिल २०२६ या कालावधीत प्रगत टेस्ट हँडसेट्स आणि सॉफ्टवेअर सिस्टम्सच्या माध्यमातून ही तपासणी करण्यात आली.

असे झाले मोबाईल नेटवर्कचे 'ऑपरेशन'

ट्रायने आपल्या नियुक्त एजन्सीमार्फत ग्राहकांच्या रोजच्या प्रवासाचे आणि गर्दीच्या ठिकाणांचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी खालीलप्रमाणे चाचण्या घेतल्या:

सिटी ड्राईव्ह: जिल्ह्यातील मुख्य शहरांमध्ये ४५१.७ किमी प्रवास करून नेटवर्क तपासले गेले.

हायवे ड्राईव्ह: पुणे ते पणजी (गोवा विमानतळापर्यंत) महामार्गावर ५६७.३ किमी अंतराची चाचणी.

हॉटस्पॉट आणि वॉक टेस्ट: १३ महत्त्वाच्या पर्यटन व सार्वजनिक ठिकाणी स्थिर चाचणी, तर गर्दीच्या ठिकाणी ८.५ किमी पायी चालून (Walk Test) नेटवर्कचा दर्जा मोजला गेला.

या प्रमुख निकषांवर झाली चाचणी:

२G, ३G, ४G आणि ५G या सर्व नेटवर्कवर लाईव्ह डेटा आणि व्हॉईस कॉल्स करून खालील निकषांची नोंद करण्यात आली:

१. कव्हरेजमधील त्रुटी (Coverage Holes)

२. कॉल ड्रॉप रेट (Call Drop Rate)

३. कॉल सेटअप सक्सेस रेट (Call Setup Success Rate)

Advertisement

४. डेटा डाउनलोड आणि अपलोड थ्रुपुट (Data Speed)

५. कॉल सायलन्स (Call Silence)

तपासणी झालेली प्रमुख क्षेत्रे:

शहरे व गावे: कुणकेश्वर, देवगड, वडदे, कसाळ, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला, तारकर्ली, मालवण आणि आचरा.

महामार्ग मार्ग: पुणे ते पणजी दरम्यान पिरंगुट, ताम्हिणी, माणगाव, लोणेरे, पोलादपूर, खेड, तुरळ, संगमेश्वर, राजापूर, तळेरे, कुडाळ आणि गोवा दाबोलीम आंतरराष्ट्रीय विमानतळ.

हॉटस्पॉट्स (पर्यटन स्थळे): चिवला बीच, रॉक गार्डन, देवबाग बीच, कुणकेश्वर मंदिर, सिंधुदुर्ग किल्ला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आणि कणकवली-कुडाळ-सावंतवाडीची मुख्य बाजारपेठ.

पायी चाचणी (Walk Test): कुडाळ एमआयडीसी, कुडाळ रेल्वे स्टेशन, मालवण जेट्टी, सावंतवाडी तलाव परिसर आणि वेंगुर्ला मार्केटच्या अंतर्गत रस्त्यांचा यात समावेश होता.

पुढील कारवाईसाठी कंपन्यांना तंबी

या ड्राईव्ह टेस्टदरम्यान समोर आलेले निष्कर्ष आणि नेटवर्कमधील त्रुटींबाबतचा अहवाल संबंधित दूरसंचार सेवा पुरवठादार (TSP) कंपन्यांना पाठवण्यात आला असून, त्यांना तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सविस्तर अहवाल कुठे पाहावा?

या चाचणीचा सविस्तर अहवाल 'ट्राय'च्या www.trai.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ग्राहकांना किंवा कंपन्यांना अधिक माहिती हवी असल्यास ते adv.bengaluru@trai.gov.in या ईमेलवर किंवा +९१-८०-२२८६५००४ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.