नाशिक (प्रतिनिधी), दि. १० जानेवारी २०२६ - नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक ३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार अंबादास खैरे यांनी मोठी मुसंडी मारली आहे. गेल्या पाच वर्षांत नगरसेवक गायब झाल्याचा आरोप करणाऱ्या नागरिकांनी आता खैरे यांच्या रूपाने नवा पर्याय निवडल्याचे दिसत आहे. विशेषतः प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांनी अंबादास खैरे यांना विजयाचा कौल देत 'आशीर्वाद' दिल्याने त्यांचा विजयाचा मार्ग आता अधिक सुकर झाला आहे.
प्रभाग ३ मधील टकले नगर, औदुंबरनगर, गणेशवाडी, औरंगाबाद नाका, वृंदावननगर, लक्ष्मीनगर आणि रासबिहारी शाळा परिसरातील नागरिकांमध्ये सध्या विद्यमान लोकप्रतिनिधींविरुद्ध मोठा रोष पाहायला मिळत आहे. "निवडून आल्यावर पाच वर्षे एकही नगरसेवक आमच्या समस्या जाणून घ्यायला फिरकला नाही," असा आरोप स्थानिक रहिवासी करत आहेत. या निष्क्रियतेमुळे निर्माण झालेली पोकळी अंबादास खैरे यांनी आपल्या दांडग्या लोकसंपर्काने भरून काढली आहे.
समस्यांच्या विळख्यात प्रभाग ३
प्रभागातील नागरिक सध्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने: प्रमुख रस्त्यांचे जाळे खिळखिळे झाले आहे. अनेक सोसायट्यांच्या अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत आहे. औरंगाबाद नाका, काट्या मारूती चौक आणि गणेशवाडी परिसरात नियोजनाअभावी वाहतूक कोंडी होत आहे. परिसरात कचरा संकलन योग्य पद्धतीने होत नाही त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

खैरेंच्या कामाची पावती; ज्येष्ठांचा पाठिंबा
अंबादास खैरे यांनी प्रचारादरम्यान प्रभाग ३ मधील प्रत्येक गल्लीत जाऊन ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. खैरे यांची नम्रता आणि समस्या सोडवण्याची जिद्द पाहून ज्येष्ठांनी त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. "जो आमच्या हाकेला धावेल, तोच आमचा नगरसेवक," अशी भूमिका घेत अनेकांनी खैरे यांना निवडणुकीत पूर्ण ताकदीने पाठबळ देण्याचे आश्वासन दिले आहे. या आशीर्वादामुळे खैरे यांची प्रतिमा एका 'विश्वासार्ह नेता' म्हणून उभी राहिली आहे.
विकासाचे व्हिजन आणि निर्धार
प्रचाराच्या दरम्यान बोलताना अंबादास खैरे म्हणाले की, "प्रभागातील वाहतूक कोंडी सोडवणे आणि रस्त्यांचे दर्जेदार काम करणे हे माझे प्राधान्य आहे. गेल्या पाच वर्षांतील निष्क्रियता संपवून प्रभाग ३ ला नाशिकमधील एक आदर्श प्रभाग बनवण्यासाठी मी कटिबद्ध आहे."
ज्येष्ठ नागरिकांचा पाठिंबा, तरुणांचा उत्साह आणि महिलांचा मिळालेला प्रतिसाद पाहता, प्रभाग ३ मध्ये यंदा अंबादास खैरे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडणार, हे आता निश्चित मानले जात आहे.