नाशिक जिल्ह्यात आणखी १३ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित... अशा आढळल्या गंभीर त्रुटी...

Share:
Main Image
Last updated: 14-Jul-2026

एस.के. खेडकर, (नाशिक) १४ जुलै - खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा पुरवठा व्हावा यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणखी १३ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा परवाना अधिकारी रवींद्र माने यांनी ही माहिती दिली आहे. या कठोर कारवाईमुळे नाशिक जिल्ह्यातील बोगस व नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्या केंद्रचालकांचे धाबे दणाणले आहेत.

अशा आढळल्या गंभीर त्रुटी

कृषी विभागाच्या भरारी पथकांनी जिल्ह्यातील विविध केंद्रांची अचानक तपासणी केली. यावेळी e-POS साठ्यातील अनियमितता, भावफलक व साठाफलक अद्ययावत नसणे, विक्रीचे अभिलेखे (रेकॉर्ड) व्यवस्थित न ठेवणे, तसेच शेतकऱ्यांना 'एम' फॉर्ममधील देयके (बिले) न देणे आणि बिलावर शेतकऱ्यांची स्वाक्षरी न घेणे अशा गंभीर त्रुटी आढळून आल्या. याप्रकरणी १३ जुलै रोजी झालेल्या सुनावणीत केंद्रचालकांनी दिलेले खुलासे असमाधानकारक आढळल्याने ही निलंबनाची कारवाई करण्यात आली.

कृषी विभागाच्या कारवाईचा धडाका (१ एप्रिल २०२६ पासून आजअखेर)

कारवाईचा प्रकारसंख्या

एकूण निलंबित परवाने११२

खते विक्री परवाने९०

बियाणे विक्री परवाने१०

कीटकनाशक विक्री परवाने१२

कायमस्वरूपी रद्द परवाने४२

दाखल गुन्हे (पोलीस केसेस)०४

Advertisement

 

...तर थेट व्हॉट्सॲपवर तक्रार करा!

"शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून खरिपाचे नियोजन केले आहे. कोणत्याही परिस्थितीत निकृष्ट दर्जाच्या कृषी निविष्ठांची किंवा जादा दराने विक्री खपवून घेतली जाणार नाही. शेतकऱ्यांनी अधिकृत केंद्राकडूनच खरेदी करावी आणि पक्की पावती घ्यावी. काही तक्रार असल्यास जिल्हास्तरीय व्हॉट्सॲप क्रमांक ७८२१०३२४०८ वर संपर्क साधावा."

— रवींद्र माने (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नाशिक)

तालुकानिहाय कृषी अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण) संपर्क क्रमांक:

शेतकऱ्यांना तक्रार करणे सोपे व्हावे यासाठी कृषी विभागाने तालुकानिहाय संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत:

नाशिक: ९१८५२१५३६९ | इगतपुरी: ९१८५२१५६२९ | त्र्यंबकेश्वर: ९१८५२१५४००

पेठ: ९१८५२१५४८७ | निफाड: ९MD११६१९६७५ | सिन्नर: ९१८५२१५१२८

येवला: ९१८५२१५५८४ | चांदवड: ९१८५२१५१७२ | कळवण: ९१८५२१५२७४

देवळा: ९१८५२१५३०५ | दिंडोरी: ९१८५२१५२२८ | सुरगाणा: ९१८५२१५३२४

मालेगाव: ९१८५२१५५१७ | बागलाण: ९१८५२१५०६६ | नांदगाव: ९१८५२१५०२१

Advertisement

Comments

No comments yet.