नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा... उद्योजक महेंद्र छोरिया यांची राज्यस्तरावर तज्ज्ञ म्हणून नियुक्ती...

Share:
Main Image
Last updated: 14-Jul-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) १४ जुलै - येथील 'यश फूड प्रोसेसर्स प्रा. लि.'चे संचालक तथा 'सोनपरी भगार' या नामांकित ब्रँडचे प्रवर्तक महेंद्र छोरिया यांची महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत राज्यस्तरीय कार्यगटावर नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र श्री अन्न (मिलेट्स) व अपॉर्च्युनिटी क्रॉप्स मिशन (MSOM) अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या “मिलेट प्रक्रिया व कापणीनंतरचे व्यवस्थापन” (Millet Processing and Post-Harvest Management) या विषयावरील कार्यगटात त्यांची 'डोमेन एक्स्पर्ट' (Domain Expert) म्हणून निवड झाली आहे.

भारतीय कृषी क्षेत्रात मिलेट्सच्या (तृणधान्य) सर्वांगीण विकासासाठी आणि मूल्यवर्धनासाठी हा अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला जात आहे. यासाठी इंडियन स्कूल ऑफ बिझनेस (ISB), हैदराबाद येथील 'भारती इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक पॉलिसी' (BIPP), एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन (MSSRF), चेन्नई आणि महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध विषयांवरील तज्ज्ञ कार्यगटांची स्थापना करण्यात येत आहे.

राज्याचा कृती आराखडा तयार करण्यात बजावणार भूमिका

या अत्यंत महत्त्वाच्या कार्यगटामार्फत महाराष्ट्रातील मिलेट प्रक्रिया तंत्रज्ञान, कापणीनंतरचे व्यवस्थापन, तृणधान्यांचे मूल्यवर्धन, आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर, या क्षेत्रातील तांत्रिक अडचणी आणि धोरणात्मक शिफारसींवर काम केले जाणार आहे. राज्यासाठीचा आगामी कृती आराखडा तयार करण्यात महेंद्र छोरिया आपले बहुमोल मार्गदर्शन व योगदान देणार आहेत.

Advertisement

दोन दशकांचा प्रदीर्घ अनुभव

महेंद्र छोरिया हे गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून मिलेट प्रक्रिया क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि आधुनिक प्रक्रिया प्रणाली विकसित करण्यात त्यांचा मोठा हातखंडा आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना यापूर्वीही राष्ट्रीय स्तरावरील विविध प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा

महेंद्र छोरिया यांच्या या राज्यस्तरीय नियुक्तीमुळे नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्राच्या मिलेट उद्योगाला एक नवी दिशा आणि गती मिळण्यास मदत होणार आहे, असा विश्वास कृषी व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Advertisement

Comments

No comments yet.