पायी जाणाऱ्या शेतकऱ्याला बेदम मारहाण करून लुटले... दोघा भामट्यांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल...

Share:
Main Image
Last updated: 09-Jul-2026

निफाड, (प्रतिनिधी) ९ जुलै - रस्त्याने पायी आपल्या घराकडे जाणाऱ्या एका शेतकऱ्याला अडवून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत लुटल्याची धक्कादायक घटना सायखेडा (ता. निफाड) येथे घडली आहे. दोघा भामट्यांनी शेतकऱ्याच्या खिशातील ५ हजार रुपयांची रोकड आणि मोबाईल फोन बळजबरीने हिसकावून घेत पोबारा केला. याप्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किराणा घेऊन जाताना घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाकर निवृत्ती लोखंडे (वय ४८, रा. शिंगवे रोड, सायखेडा, ता. निफाड) यांनी याप्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोखंडे हे सोमवारी (६ जुलै) रात्री किराणा माल आणि बाजाराची खरेदी करण्यासाठी सायखेडा गावात आले होते. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ते खरेदी केलेला किराणा माल सोबत घेऊन पायी घराकडे निघले होते.

Advertisement

दुकान परिसरातच अडवला रस्ता

लोखंडे हे गावातील संजय गुजराथी यांच्या किराणा दुकानाजवळून जात असताना, तेथे पाळत ठेवून बसलेल्या दोघा भामट्यांनी त्यांचा रस्ता अडवला. काही समजण्याच्या आतच संशयितांनी लोखंडे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

रोकड आणि मोबाईल हिसकावला

मारहाणीदरम्यान लोखंडे हतबल झाल्यानंतर संशयितांनी त्यांच्या खिशाला हात घालून त्यातील ५ हजार रुपयांची रोकड आणि मोबाईल फोन बळजबरीने हिसकावून घेतला व अंधाराचा फायदा घेत तिथून पळ काढला. याप्रकरणी पोलिसांनी ऋतिक कापसे व त्याच्या एका साथीदाराविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस जमादार कर्डक करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.