सीए फाउंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर... नाशिकची साक्षी जैन देशात पहिली...

Share:
Main Image
Last updated: 03-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३ जुलै - इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) तर्फे मे २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या 'सीए फाउंडेशन' (CA Foundation) परीक्षेचा निकाल आज घोषित करण्यात आला. या निकालात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून, नाशिकची साक्षी जैन हिने ३७१ गुण (९२.७५%) मिळवून संपूर्ण देशात प्रथम क्रमांक (AIR 1) पटकावला आहे. आयसीएआयने (ICAI) आपल्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल प्रसिद्ध केला असून, यंदा देशाचा एकूण निकाल २०.०९% लागला आहे.

महाराष्ट्राचा दबदबा: पहिल्या तिन्ही क्रमांकांवर मराठी मोहर

यंदाच्या निकालात पहिल्या तिन्ही क्रमांकांवर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.

पहिला क्रमांक (AIR 1): साक्षी जैन (नाशिक) – ३७१ गुण (९२.७५%)

दुसरा क्रमांक (AIR 2): अयानअब्बास अजानी (चंद्रपूर) – ३६७ गुण (९१.७५%)

तिसरा क्रमांक (AIR 3): राधा उमेश मुळे (पुणे) – ३६५ गुण (९१.२५%)

Advertisement

मुलांचा टक्का मुलींपेक्षा किंचित जास्त

या परीक्षेसाठी देशभरातून आणि परदेशातील ६०९ केंद्रांवरून एकूण १,०६,१४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, ज्यापैकी ९०,२१७ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले होते. त्यापैकी १८,१२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा मुलांचा उत्तीर्ण होण्याचा टक्का मुलींच्या तुलनेत किंचित जास्त राहिला आहे.

मुले: एकूण ४६,७९८ मुलांनी परीक्षा दिली, त्यापैकी ९,७६९ मुले उत्तीर्ण झाली असून मुलांचा निकाल २०.८८% लागला.

मुली: एकूण ४३,४१९ मुलींनी परीक्षा दिली, त्यापैकी ८,३५५ मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलींचा निकाल १९.२४% लागला.

विद्यार्थ्यांनी आपला सविस्तर निकाल पाहण्यासाठी आयसीएआयच्या caresults.icai.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांवर सध्या देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.