नाशकात पुन्हा 'लव्ह जिहाद' प्रकरण... बळजबरीने कुराण पठण... घरात डांबून महिलेवर अत्याचार...

Share:
Main Image
Last updated: 01-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १ जुलै - एका ४१ वर्षीय विवाहित महिलेला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. संशयित आरोपीने केवळ अत्याचारच केला नाही, तर पीडित महिलेला कपाळाला टिकली लावण्यास मनाई करून, तिला बळजबरीने कुराण वाचायला लावून धार्मिक भावना दुखावल्याची गंभीर तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणी नाशिक शहराच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रियाज बुराउद्दिन शेख (वय ४०, रा. संजीवनी नगर, मारुती मंदिर जवळ, अंबड, नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

Advertisement

ओळख, प्रेम अन् लग्नाचे आमिष
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला मूळची नवी दिल्ली येथील रहिवासी असून सध्या नाशिकच्या अशोक स्तंभ परिसरातील घारपुरे घाट भागात वास्तव्यास आहे. माहे जानेवारी २०२० ते ३० जून २०२६ या कालावधीत ही घटना घडली. संशयित आरोपी रियाज शेख याने नाशिकमधील रविवार कारंजा परिसरात पीडित महिलेशी ओळख वाढवली. त्यानंतर तिच्याशी प्रेमाचे खोटे नाटक करून संबंध प्रस्थापित केले. विश्वास संपादन करून त्याने पीडित महिलेकडून तिची महत्त्वाची कागदपत्रे आणि बँकेचे पासबुक स्वतःकडे काढून घेतले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिला वेळोवेळी दूध बाजार, भद्रकाली येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केला.

दर्ग्यात नेऊन पाजले पाणी; घरात डांबून अत्याचार
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपी रियाज याने पीडितेला इगतपुरी येथील सद्रदुदिन पिंपरी दर्गा येथे नेले. तेथे ग्लासमध्ये 'गुलाबजल' असल्याचे सांगून तिला एक पाणी पिण्यास दिले. त्यानंतर तिला संजीवनी नगर, अंबड येथील त्याच्या राहत्या घरी नेले. तिथे तो करीत असलेले कुराण पठण तिला बळजबरीने ऐकायला भाग पाडले, तसेच तिलाही जबरदस्तीने कुराण वाचायला लावले.

कपाळाला टिकली लावण्यास मनाई
पीडित महिलेने जेव्हा या सर्व गोष्टींना स्पष्ट नकार दिला, तेव्हा संशयित रियाज याने तिच्यावर प्रचंड राग काढून तिला कपाळावर टिकली लावण्यास सक्त मनाई केली. महिलेच्या धार्मिक भावना दुखावून तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आला. अखेर या जाचाला कंटाळून पीडित महिलेने पोलिसात धाव घेतली.

भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल

पीडित महिलेच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात आरोपी रियाज बुराउद्दिन शेख याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २९९, ३०२ आणि ६९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री या गुन्ह्याची रीतसर नोंद करण्यात आली आहे. या खळबळजनक प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पूनम नाईक करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.