नीट व जेईई परीक्षा... मोफत कोचिंग हवे आहे? तातडीने येथे करा अर्ज...

Share:
Main Image
Last updated: 25-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २५ जून - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर, येवला, चांदवड आणि निफाड या आठ तालुक्यांतील अनुसूचित जमातीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी नीट  व जेईई स्पर्धा परीक्षांच्या मोफत कोचिंगसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  यासाठी होणाऱ्या चाळणी परीक्षेसाठी 10 वी परीक्षा उच्च गुणवत्तेसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी  30 जून 2026 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभाग, नाशिकच्या प्रकल्प अधिकारी  अर्पिता ठुबे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. यासाठी 100 गुणांची चाळणी परीक्षा 12 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता  ब्रम्हाव्हॅली शैक्षणिक संकुल, त्र्यंबकेश्वर, ता.त्र्यंबकेश्वर, जि.नाशिक येथे होईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय आश्रमशाळा बोपेगाव,ता.दिडोरी, जि.नाशिक येथे इयत्ता 11 वी विज्ञान शाखेत प्रवेश देण्यात येणार असून नामांकित शैक्षणिक संस्थेकडून  नीट/ जेईई  परीक्षेसाठी विनामूल्य कोचिंग देण्यात येणार आहे.

‍आवश्यक पात्रता

Advertisement

विद्यार्थी अनुसूचित जमातीचा व महाराष्ट्राचा रहिवासी असावा. मार्च 2026 मध्ये इयत्ता 10 वी परीक्षा 70 टक्के किंवा अधिक गुणांनी उत्तीर्ण असावा. प्रत्यक्ष प्रवेशाच्या वेळी जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक राहील. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक यांच्या अधिनस्थ शासकीय/ अनुदानित आश्रमशाळैतील विद्यार्थ्यांनी त्यांचे आवेदनपत्र त्यांच्या आश्रमशाळेमार्फत सादर करावेत. इतर शाळांमधील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज शाळेतील मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरी व शिक्क्यासह प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी प्रकल्प, नाशिक, आदिवासी विकास भवन, नाशिक येथे 30 जून 2026 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. 

अधिक माहितीसाठी व अर्जाच्या विहित नमुना प्राप्त करण्यासाठी  एकात्कि आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक येथे संपर्क साधावा, असेही प्रकल्प अधिकारी ठुबे यांनी कळविले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.