लायन्स क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटीझनची नवीन कार्यकारिणी जाहीर

Share:
Main Image
Last updated: 14-Jun-2026

नाशिक (प्रतिनिधी) १४ जून - लायन्स क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटीझनच्या २०२६-२७ या वर्षासाठीच्या नवीन कार्यकारिणीची निवड नुकतीच एकमताने करण्यात आली. यामध्ये लायन सचिन वाघमारे यांची अध्यक्षपदी, लायन रवींद्र सोनजे यांची सचिवपदी तर लायन संजय दुसे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे क्लबच्या सर्व सदस्यांनी अभिनंदन केले. आगामी वर्षात विविध समाजोपयोगी व सेवाभावी उपक्रम राबवून क्लबचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा निर्धार नव्या कार्यकारिणीने व्यक्त केला. यावेळी क्लबचे संस्थापक अध्यक्ष लायन जयंत येवला यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देताना, समाजसेवा, नेतृत्व आणि संघभावना यांच्या बळावर क्लबची यशस्वी वाटचाल कायम ठेवण्याचा विश्वास व्यक्त केला.

Advertisement

या प्रसंगी क्लबचे अध्यक्ष लायन योगेश नेरकर, झोन चेअरमन लायन राजेंद्र कोठावदे, माजी अध्यक्ष व माजी झोन चेअरमन लायन विनोद सोनजे, माजी अध्यक्ष लायन भूषण कोठावदे, माजी झोन चेअरमन लायन महेश पितृभक्त, लायन विलास लधपरे, लायन रामचंद्र जोशी आणि लायन रवींद्र झोपे यांच्यासह क्लबचे अनेक सदस्य उपस्थित होते. नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Advertisement

Comments

No comments yet.