मनोहर शिंदे, (नाशिक) १३ जून - नाशिक मध्ये होत असलेले विकास कार्य , पायाभूत सुविधा ची निर्मिती ,रस्ते ,विमान आणि रेल्वे सेवांचे वाढते जाळे ,येऊ घातलेली मेट्रो ,शिक्षण ,आरोग्य सेवा आणि उद्योग या मधील सकारात्मक वाढ या सर्वांमुळे नाशिक ची प्रगती आता अनस्टॉपेबल आहे आणि या नाशिक मध्ये आज केलेली प्लॉट मधील गुंतवणूक भविष्यात निश्चितच फलदायी ठरणार असल्याचे प्रतिपादन महापौर हिमगौरी आडके - आहेर यांनी केले.१३ आणि १४ जून या दोन दिवस चालणाऱ्या क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित प्लॉट एक्सपोच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. गोविंद नगर येथील मनोहर गार्डन (ट्रीट हॉटेल) येथे या प्लॉट एक्स्पो चे आयोजन करण्यात आले आहे.
समृद्ध आणि प्रगतिशील नाशिक मध्ये स्वतःचे टुमदार घर, घरासमोर अंगण ,अंगणात बाग, घरावर स्वतःची गच्ची अशी स्वप्न साकार करण्याची तसेच भविष्यातील लाभासाठी प्रगतिशील नाशिक मध्ये जमिनीमध्ये गुंतवणूक संधी क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे ‘प्लॉट एक्स्पो’ च्या निमित्ताने उपलब्ध करून देण्यात आली असून या प्लॉट एक्स्पो ला पहिल्याच दिवशी भरघोस प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी दिली. या एक्सपो मध्ये अगदी 10 लाखापासून पुढे प्लॉट्स उपलब्ध असून अशा प्रकारचा प्लॉट एक्सपो म्हणजे प्लॉटचे प्रदर्शन पहिल्यांदाच आयोजित करण्यात येत असल्याचेही क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी नमूद केले.
या प्रदर्शनामध्ये नाशिक शहर तसेच चांदशी, त्र्यंबक, घोटी, इगतपुरी, मखमलाबाद ,आडगाव, पाथर्डी, इंदिरानगर, म्हसरूळ, वडनेर, नांदूर नाका, औरंगाबाद रोड, नाशिक रोड, ओझर या भागातील प्लॉट्स उपलब्ध असून प्लॉट खरेदी तसेच घर बांधण्यासाठी अर्थ सहायचे मार्गदर्शन देखील येथे करण्यात येत आहे. या प्रदर्शनास नाशिक सोबतच मुंबई ,पुणे ,जळगाव ,धुळे येथून देखील अनेक जण भेट देत असल्याचे एक्स्पो चे समन्वयक भूषण कोठावदे यांनी सांगितले.
आगामी कुंभ मेळ्याच्या निमित्ताने नाशिकची देशातील सर्व प्रमुख शहरांची कनेक्टिव्हिटी उत्तम होत असून नाशिकच्या नियोजित वाढीचा आणि भविष्यकालीन संधींचा लाभ घेण्यासाठी प्लॉटमध्ये आज केलेली गुंतवणूक भविष्यात नक्कीच चांगला परतावा देईल असा आशावाद सहसमन्वयक शाम साबळे यांनी व्यक्त केला.
रियल इस्टेट क्षेत्रामध्ये क्रेडाई ची ओळख ही एक विश्वासार्ह संस्था म्हणून आहे .त्यामुळे क्रेडाई ने आयोजित केलेल्या प्लॉट एक्स्पो ला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे क्रेडाई एक्स्पो कमिटी प्रमुख मनोज खिवसरा यांनी नमूद केले. निवासी, औद्योगिक ,व्यावसायिक, फार्म हाऊस आणि व्हिला प्लॉट्सच्या अनेक पर्यायांसाठी एक्सपोला भेट द्यायचे आवाहन देखील त्यांनी केले.
क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव तुषार संकलेचा म्हणाले या प्लॉट एक्स्पो ला मिळत असलेल्या प्रतिसादाने नाशिक मधील अर्थकारणास सकारात्मक चालना मिळणार असून याचा लाभ शहरातील अनेक घटकांना होणार आहे असे सांगितले. दिनांक १४ रोजी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. उद्घाटन सोहळ्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष आणि नगरसेवक सुरेश अण्णा पाटील , जितुभाई ठक्कर, अनंत राजेगावकर,अविनाश शिरोडे सुनील कोतवाल, उमेश वानखेडे ,यांची प्रमुख उपस्थिती होती.
एक्स्पो यशस्वीतेसाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे आयपीपी कृणाल पाटील ,उपाध्यक्ष अनिल आहेर, अंजन भालोदिया, उदय घुगे ,कोषाध्यक्ष श्रेणिक सुराणा ,सहसचिव सचिन बागड,नरेंद्र कुलकर्णी ,ऋषिकेश कोते, हंसराज देशमुख तसेच समिती सदस्य अनंत ठाकरे ,विजय चव्हाणके ,सागर शाह ,निशित अटल ,सुशील बागड ,निरंजन शाह, वृषाली हिरे, दिपाली बिरारी, सहयोगी सदस्य सतीश मोरे, सुशांत गांगुर्डे ,अभिषेक महाजन, समीर सोनवणे आमंत्रित सदस्य मनोज लाडानी हर्षल हणमंते , शिवम पटेल, हिरेन भडजा मयुरेश चौधरी, ऋषभ जैन, क्रेडाई युवा विंग समन्वयक आदित्य भातंबरेकर, सहसमन्वयक अजिंक्य नहार हे प्रयत्नशील आहेत.