लघु उद्योग भारती नाशिक शाखेच्या अध्यक्षपदी नितीन ढगे... अशी आहे नवी कार्यकारिणी...

Share:
Main Image
Last updated: 13-Jun-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) १३ जून - लघु उद्योग भारती नाशिक शाखेचा नूतन कार्यकारिणीचा सन २०२६ - २८ कार्यकाळ पदग्रहण स्वीकार समारोह गुरुवार दिनांक ११ जून २०२६ रोजी  सी. ए. प्रा. प्रकाश पाठक, ख्यातनाम विचारवंत आणि प्रख्यात वक्ते यांच्या उपस्थितीत नाशिक येथे पार पडला. लघु उद्योग भारती नाशिक शाखेच्या अध्यक्षपदी नितीन ढगे, कार्यवाहपदी देवेन गोसावी  तर खजिनदार म्हणून विजय अनिकेवी  यांची सन २०२६ - २८ या कार्यकाळासाठी नेमणूक करण्यात आली. मावळते अध्यक्ष निखिलजी तापडिया यांनी नूतन अध्यक्ष नितीन ढगे यांचेकडे कारभारची धुरा सोपवीली. तसेच नाशिक शाखेतर्फे राबविल्या जाणार्‍या वार्षिक कार्यक्रमांची जबाबदारीही नूतन कार्यकारिणी सदस्यांना सोपविण्यात आली. मारुती कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करताना लघु उद्योग भारतीची पदाधिकारी निवड प्रक्रिया, उद्दिष्ट, ध्येय, कार्यपध्दती इ. बद्दल सविस्तर माहिती सांगितली. मावळते अध्यक्ष निखिल तापडिया व कार्यवाह योगेश जोशी यांनी त्यांच्या कार्यकाळाचा धावता आढावा घेत मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे ख्यातनाम विचारवंत प्रा. पाठक आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, हा पदग्रहण सोहळा वैशिष्ठ्यपूर्ण आहे जिथे मावळते पदाधिकारी सहजतेने खूर्ची सोडतात व नूतन पदाधिकारी आनंदाने स्विकारतात. हे दूर्मिळ दृष्य आहे. मिळालेले पद हे उत्तम कर्तृत्व दाखविण्याची संधी असते व ती माणसे तयार करण्याची प्रक्रिया आहे. नूतन पदाधिकार्‍यांनी मागील व्यक्तींच्या सहज वावर कार्यपध्दतीचा आदर्श घेउन एकसंघ कार्य करावे. आपले कार्य करीत असताना सहकार्‍यांच्या चूका मनात न ठेवता माफ करणे, एकाच अधाराने प्रगती करणे, सहकार्‍यांचे दोष त्यांना नकळत दूर करण्याचा प्रयत्न करणे, कार्यकर्त्यांना अलगद सांभाळणे इ. नेतृत्वाचे वैशिष्ठ्य असतात असे त्यांनी सांगीतले. सांघीक कार्य हे दहिहंडीसारखे असावे असे त्यांनी स्पष्ट केले. सर्व नूतन कार्यकारिणीचे प्रमूख पाहुण्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी लघु उद्योग भारतीचे मारुती कुलकर्णी, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश, सुहास वैद्य, कार्यवाह रा.स्व. संघ नाशिक, मिलिंद देशपांडे, महामंत्री  नाशिक संभाग,  यांसह प्रसिध्द व्यावसायिक, नाशिक शाखेचे माजी अध्यक्ष, कार्यवाह, सर्व कार्यकारिणी, जेष्ठ उद्योजक विवेक गोगटे, निशिकांत अहिरे, प्रदिप पेशकार, नरेंद्र नांदे, ओमप्रकाश कुलकर्णी, प्रकाश भिडे, सचिन तरटे यांसह निमा चे अध्यक्ष आशिष नहार, कार्यवाह राजेंद्र आहीरे  तसेच आयमा, नाइस, स्टाईस, सीईटीपी, निवेक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. वंदे मातरम् नेहा ढगे यांनी सादर केले. सूत्रसंचालन सुप्रिया देवघरे तर आभार देवेन गोसावी यांनी व्यक्त केले.

   पदाधिकारी                  जबाबदारी 

१  नितीन ढगे                 अध्यक्ष

२  देवेन गोसावी             कार्यवाह 

३  विजय अनिकेवी         खजिनदार 

४  वीणा माजगांवकर      उप अध्यक्ष

५  अतुल देशमुख           उप अध्यक्ष

६  तुषार बिरारी             सह कार्यवाह

७  उर्विश जोशी             सह कार्यवाह

८  जयंत पवार              सह खजिनदार

९  धनलक्ष्मी पटवर्धन    अतिरिक्त पदाधिकारी

१०  सुजाता बच्छाव       अतिरिक्त पदाधिकारी

११  योगेश जोशी           अतिरिक्त पदाधिकारी

१२  रावसाहेब रकीबे     अतिरिक्त पदाधिकारी

१३  ऋता पंडित            कार्यकारिणी सदस्य

Advertisement

१४  सुप्रिया देवघरे        कार्यकारिणी सदस्य

१५  सारंग अत्तरदे         कार्यकारिणी सदस्य

१६  कुणाल शिकारे       कार्यकारिणी सदस्य

१७  मनोहर शेवाळे       कार्यकारिणी सदस्य

१८  दुर्गेश पुराणिक       कार्यकारिणी सदस्य

१९  किरण वाघ            कार्यकारिणी सदस्य

२०  विवेक कापडणीस  कार्यकारिणी सदस्य

२१  सुमेध गायधनी       कार्यकारिणी सदस्य

२२ संदेश पिसोळकर   कार्यकारिणी सदस्य

२३  गंगाधर परांजपे      कार्यकारिणी सदस्य

२४  मंगेश भणगे          कार्यकारिणी सदस्य

२५  प्रसेन कापडिया     कार्यकारिणी सदस्य

२६  प्रमोद महेश्वरी       कार्यकारिणी सदस्य

२७  विजय पवार          कार्यकारिणी सदस्य

२८  रोहित शहाणे        कार्यकारिणी सदस्य

२९  प्रशांत कुलकर्णी    कार्यकारिणी सदस्य

३०  सचिन जोशी          कार्यकारिणी सदस्य

३१  स्वप्नील क्षत्रिय        कार्यकारिणी सदस्य

Advertisement

Comments

No comments yet.