नाशिक (प्रतिनिधी), दि. ६ जानेवारी २०२६ - नाशिक महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून प्रभाग क्रमांक २४ – ड मधून उमेदवारी करणारे अमर श्रीराम वझरे यांना प्रचार फेरीदरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद लाभत आहे. गल्लीबोळातून, वस्तीवस्तीमध्ये फिरताना नागरिक स्वतःहून पुढे येत “तुम्हीच आमचे उमेदवार आणि तुम्हीच आमचे नगरसेवक” अशा शब्दांत आपला ठाम विश्वास व्यक्त करत आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रभागात एकच चर्चा सुरू आहे – “कोण आहे हा भाग्यवान?”
अमर वझरे हे केवळ निवडणूक काळात दिसणारे उमेदवार नसून, वर्षानुवर्षे सामाजिक कार्यात अग्रेसर राहिलेले, सर्वसामान्यांशी थेट नातं जोडणारे नेतृत्व म्हणून प्रभागात त्यांची ओळख आहे. चातक फ्रेंड सर्कल या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, आपत्तीच्या काळात नागरिकांना मदतीचा हात, स्वच्छता मोहिमा, वृक्षारोपण, तसेच युवकांसाठी क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम राबवले आहेत. कोविडच्या संकट काळात जीव धोक्यात घालून त्यांनी बहुविध प्रकारची समाजसेवा केली आहे.
प्रभाग २४ मधील सोमनाथ पाटील म्हणाले की, “आम्हाला आमच्या प्रश्नांसाठी कोणत्याही कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत नाहीत. अमर वझरे हे एक फोनवर, एक हाक मारताच मदतीला धावून येतात. पाणी, रस्ते, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट, कचरा व्यवस्थापन असो वा वैयक्तिक अडचणी – ते प्रत्येक प्रश्न आपला समजून मार्ग काढतात.”
अमर वझरे यांची खासियत म्हणजे विकासाचे स्पष्ट व्हिजन असलेले नेतृत्व. प्रभागाचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधा मजबूत करणे, युवकांना रोजगाराच्या संधी, महिलांचे सक्षमीकरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा, तसेच पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार यावर त्यांचा ठाम भर आहे. “नगरसेवक म्हणजे केवळ निधी मंजूर करणारा नव्हे, तर जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारा प्रतिनिधी असावा,” अशी त्यांची भूमिका असल्याचे मत महाराणा प्रताप चौक परिसरातील ज्येष्ठ नागरिक श्रीराम काळे यांनी सांगितले आहे.
वझरे यांच्या प्रचार फेरीदरम्यान नागरिक, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्याशी संवाद साधत असून, अनेक ठिकाणी नागरिक स्वतःहून प्रचारात सहभागी होत आहेत. हा प्रतिसाद पाहता अमर वझरे हे प्रभाग २४ – ड मधील जनतेची पहिली पसंती ठरत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विकासाभिमुख धोरणांना आणि नेतृत्वावर असलेल्या विश्वासाला अमर वझरे यांचे सामाजिक कार्य, प्रामाणिकपणा आणि कामाचा अनुभव यांची भक्कम जोड मिळाली आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग २४ (ड) मधून अमर श्रीराम वझरे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.