सिंहस्थासाठी 'वन प्लॅटफॉर्म' पॅटर्न...  कोट्यवधींच्या गर्दीवर राहणार AI अन् डिजिटल कमांड सेंटरची 'रिअल टाइम' नजर...

Share:
Main Image
Last updated: 04-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ४ जून - सिंहस्थ कुंभमेळा २०२७ दरम्यान नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये येणाऱ्या कोट्यवधी भाविकांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेता, प्रशासनाने आतापासूनच कंबर कसली आहे. गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि चोख सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सर्व यंत्रणांना एकाच 'एकात्मिक डिजिटल व्यासपीठावर' (One Platform) आणण्याचे नियोजन नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने केले आहे. यासंदर्भात बुधवारी एक उच्चस्तरीय आंतरविभागीय समन्वय बैठक पार पडली.
या बैठकीला विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे, नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी आणि मनपा अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 डिजिटल 'कमांड सेंटर'द्वारे होणार तिसऱ्या डोळ्याची नजर
सिंहस्थासारख्या भव्य धार्मिक सोहळ्यात विविध शासकीय विभागांमध्ये समन्वय असणे अत्यंत महत्त्वाचे असते. यासाठी 'पीडब्ल्यूसी' (PwC) कडून प्रस्तावित तंत्रज्ञान आराखडा आणि 'इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल' (Integrated Command and Control) प्रणालीचे सादरीकरण बैठकीत करण्यात आले. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे खालील गोष्टींचे रिअल टाइम व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे:
गर्दीचा अचूक अंदाज व भाविकांची हालचाल
स्मार्ट वाहतूक नियंत्रण आणि पार्किंग व्यवस्था
चोख सुरक्षा निरीक्षण आणि तात्काळ आपत्कालीन प्रतिसाद (Emergency Response)

Advertisement

 "स्वतंत्र नव्हे, तर एकात्मिक पद्धतीने काम करावे लागेल"
"सिंहस्थ कुंभमेळ्याचे स्वरूप आणि व्याप्ती अथांग आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाने स्वतंत्रपणे काम न करता एकात्मिक (Integrated) पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. रिअल टाइम माहिती आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे गर्दी व्यवस्थापन व सुरक्षा अधिक मजबूत होईल. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन ही सक्षम यंत्रणा उभारण्यावर आमचा भर आहे."
— शेखर सिंह, आयुक्त, कुंभमेळा प्राधिकरण

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.