लग्नाचे आमिष, दोन वर्षे वासना आणि नंतर धोका... तरुणाचे असे फुटले बिंग...

Share:
Main Image
Last updated: 04-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ४ मे - प्रेमाचे नाटक करून आणि लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका तरुणीवर दोन वर्षांपासून अत्याचार करणाऱ्या नराधमाचा खरा चेहरा समोर आला आहे. पीडित तरुणीचा विश्वासघात करून दुसऱ्या मुलीशी संधान साधणाऱ्या आणि लग्नास नकार देणाऱ्या संशयितावर सातपूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेमाच्या जाळ्यात ओढून 'विश्वासघात'

प्रफुल्ल वसंत काळे (वय २९, रा. राजवाडा, द्वारका) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. अशोकनगर भागात राहणाऱ्या पीडित तरुणीशी त्याची गेल्या दोन वर्षांपासून ओळख होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर प्रफुल्लने तिला लग्नाचे स्वप्न दाखवले. याच विश्वासाचा फायदा घेत त्याने पीडितेच्या घरी, विविध हॉटेल्स आणि लॉजिंगवर नेऊन तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केले.

Advertisement

दुसऱ्या मुलीशी संधान अन् पीडितेला मारहाण

काही दिवसांपासून प्रफुल्लने पीडितेकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, त्याचे दुसऱ्या एका मुलीशी प्रेमसंबंध जुळल्याची माहिती पीडितेला मिळाली. तिने लग्नाचा तगादा लावला असता, प्रफुल्लने आपला खरा रंग दाखवला. त्याने पीडितेशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिलाच, शिवाय तिला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत बेदम मारहाणही केली.

पोलीस कारवाई आणि तपास

धक्का बसलेल्या पीडितेने अखेर सातपूर पोलीस गाठून आपल्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक नळकांडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.