पक्षबांधणीसाठी भाजपचा 'मास्टरस्ट्रोक... ५६ जिल्हा प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर... बघा, कुणाकडे कोणती जबाबदारी...

Share:
Main Image
Last updated: 21-Apr-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २१ एप्रिल - आगामी निवडणुकांचे गणित आणि पक्षसंघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाकडून राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी ‘जिल्हा प्रभारीं’च्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झालेल्या या यादीत अनुभवी नेते आणि तरुण आमदारांचा समतोल साधण्यात आला असून, उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नाशिक जिल्ह्याची जबाबदारी आमदार मंगेश चव्हाण आणि सुजय विखे पाटील यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

नाशिकमध्ये 'हायव्होल्टेज' नियुक्त्या
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या नाशिक जिल्ह्यासाठी भाजपने विशेष रणनीती आखल्याचे दिसते. नाशिक शहरासाठी आक्रमक नेते आमदार मंगेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर नाशिक दक्षिण भागासाठी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची प्रभारी म्हणून निवड झाली आहे. तसेच नाशिक उत्तरसाठी अमोल जावळे यांच्याकडे सूत्रे सोपवण्यात आली आहेत. या नियुक्त्यांमुळे नाशिकमधील भाजपच्या संघटनात्मक बांधणीला मोठी गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिग्गज नेत्यांकडे जिल्ह्यांची धुरा
यादीनुसार, अनेक दिग्गज नेत्यांना विविध जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे:
सिंधुदुर्ग: योगेश सागर
रायगड दक्षिण: नितेश राणे
ठाणे ग्रामीण: केशव उपाध्ये (मुख्य प्रवक्ते)
पुणे शहर: शेखर इमानदार
सांगली शहर: धनंजय महाडिक
नागपूर शहर: परिणय फुके

महिला नेत्यांनाही संधी
भाजपने या नियुक्ती प्रक्रियेत महिला पदाधिकाऱ्यांनाही महत्त्वाचे स्थान दिले आहे. यामध्ये भारती पवार (धुळे शहर), अॅड. माधवी नाईक (भिवंडी), राणी द्विवेदी (पालघर), रोहिणी नायडू (जळगाव शहर) आणि निवेदिता चौधरी (खामगाव) यांच्यासह अन्य महिला नेत्यांचा समावेश आहे.

Advertisement

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि राजकीय समीकरणे लक्षात घेता, जिल्हा स्तरावर समन्वय वाढवण्यासाठी या नियुक्त्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. संबंधित जिल्ह्यांतील संघटनात्मक कामाचा आढावा घेणे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे आणि सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे, ही मुख्य जबाबदारी या नवनियुक्त जिल्हा प्रभारींवर असणार आहे.
आज जाहीर झालेल्या या ५६ जणांच्या यादीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, नवीन प्रभारी आता आपल्या कार्यक्षेत्रात कधीपासून सक्रिय होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपा महाराष्ट्र - जिल्हा प्रभारी नियुक्ती यादी (२१ एप्रिल २०२६)
बघा संपूर्ण यादी 

अ.क्र जिल्हा जिल्हा प्रभारी
१ सिंधुदुर्ग - श्री. योगेश सागर
२ रत्नागिरी उत्तर श्री. प्रशांत ठाकूर
३ रत्नागिरी दक्षिण श्री. निरंजन डावखरे
४ रायगड उत्तर श्री. अतुल काळसेकर
५ रायगड दक्षिण श्री. नितेश राणे
६ ठाणे शहर श्री. विक्रांत पाटील
७ ठाणे ग्रामीण श्री. केशव उपाध्ये
८ भिवंडी अॅड. माधवी नाईक
९ मीरा - भाईंदर श्री. संतोष जनाटे
१० वसई विरार श्री. हेमंत सावरा
११ नवी मुंबई श्री. शशिकांत कांबळे
१२ कल्याण श्री. जयप्रकाश ठाकूर
१३ उल्हासनगर श्री. नाना सूर्यवंशी
१४ पालघर श्रीमती राणी द्विवेदी
१५ नंदुरबार श्री. बबनराव चौधरी
१६ धुळे शहर श्रीमती भारती पवार
१७ धुळे ग्रामीण श्री. रविंद्र अनासपुरे
१८ मालेगांव श्री. इद्रिस मुलतानी
१९ नाशिक शहर श्री. मंगेश चव्हाण
२० नाशिक उत्तर श्री. अमोल जावळे
२१ नाशिक दक्षिण श्री. सुजय विखे पाटील
२२ जळगाव शहर श्रीमती रोहिणी नायडू
२३ जळगांव पूर्व (रावेर) श्री. अनुप अग्रवाल
२४ जळगांव पश्चिम श्री. प्रदिप पेशकार
२५ अहिल्यानगर उत्तर श्री. लक्ष्मण सावजी
२६ अहिल्यानगर दक्षिण श्री. राम सातपुते
२७ अहिल्यानगर शहर श्रीमती भैरवी वाघ
२८ पुणे शहर श्री. शेखर इमानदार
२९ पुणे उत्तर (मावळ) श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर
३० सातारा श्री. राजेश पांडे
३१ पुणे दक्षिण (बारामती) श्री. सदाशिव खाडे
३२ पिंपरी चिंचवड श्री. भरत पाटील
३३ सोलापूर शहर श्री. योगेश टिळेकर
३४ सोलापूर पूर्व श्री. गोपीचंद पडळकर
३५ सोलापूर पश्चिम (माढा) श्री. संजय जगताप
३६ कोल्हापूर शहर श्री. विक्रम पावसकर
३७ कोल्हापूर पूर्व (हातकणंगले) श्री. रामकृष्ण वेताळ
३८ कोल्हापूर पश्चिम (करवीर) श्री. पृथ्वीराज पाटील
३९ सांगली शहर श्री. धनंजय महाडिक
४० सांगली ग्रामीण श्रीमती वर्षा डहाळे
४१ बुलढाणा श्री. जयंत देहनकर
४२ खामगांव श्रीमती निवेदिता चौधरी
४३ अकोला शहर श्री. नितीन भुतडा
४४ अकोला ग्रामीण श्री. प्रवीण पोटे
४५ वाशिम श्री. रणधीर सावरकर
४६ अमरावती शहर श्री. संजय कुटे
४७ अमरावती ग्रामीण (मोर्शी) श्री. अविनाश देव
४८ अमरावती ग्रामीण (मेळघाट) श्री. विजयराव जाधव
४९ यवतमाळ श्री. सुमित वानखेडे
५० पुसद श्री. दिनेश सूर्यवंशी
५१ वर्धा श्री. संजय भेंडे
५२ नागपूर शहर श्री. परिणय फुके
५३ नागपूर ग्रामीण (रामटेक) श्री. राजीव पोटदार
५४ नागपूर ग्रामीण (काटोल) श्री. सुधाकर कोहळे
५५ भंडारा श्री. रामदास तडस
५६ गोंदिया आ. प्रविण दटके

?s=20

Comments

No comments yet.