नाशिक TCS धर्मांतर प्रकरण... नराधमांना परदेशातून निधी मिळाला? आता NIA, ATS आणि IB कडून चौकशी...

Share:
Main Image
Last updated: 17-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १७ एप्रिल - टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मधील कथित धर्मांतर, लैंगिक शोषण आणि छळवणूक प्रकरणाला आता आंतरराष्ट्रीय वळण लागले आहे. या प्रकरणातील 'फॉरोन फंडिंग' (परकीय निधी) आणि दहशतवादी संघटनांशी असलेल्या संभाव्य संबंधांची चौकशी करण्यासाठी नाशिक पोलिसांनी राष्ट्रीय तपास संस्था (NIA), गुप्तचर विभाग (IB) आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाची (ATS) मदत मागितली आहे.
नाशिकचे पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक यांनी यासंदर्भात अधिकृत पत्रव्यवहार केल्याची माहिती दिली असून, हे रॅकेट आंतरराष्ट्रीय स्तरावरून चालवले जात होते का, याची पडताळणी सुरू झाली आहे.

आतापर्यंत ९ गुन्हे दाखल; महिला पोलिसांची 'गुप्त मोहीम'
या संवेदनशील प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ९ गुन्हे (FIR) दाखल केले आहेत. त्यापैकी ८ गुन्हे लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आहेत, तर एक गुन्हा जबरदस्तीने धर्मांतर आणि छळाबाबत आहे. पीडित महिला कर्मचाऱ्यांना बोलतं करण्यासाठी नाशिक पोलिसांनी महिला अधिकाऱ्यांच्या मदतीने एक 'गुप्त मोहीम' राबवली होती. समुपदेशन आणि भावनिक आधार मिळाल्यानंतर अनेक पीडित महिलांनी समोर येऊन आपबिती कथन केली.

Advertisement

मुख्य सुत्रधार 'निदा खान'वर संशय
तपासातील प्राथमिक निष्कर्षांनुसार, बीपीओ विभागातील एचआर मॅनेजर निदा खान ही या संपूर्ण रॅकेटची मुख्य सूत्रधार असल्याची शंका आहे. तिच्यावर खालील गंभीर आरोप आहेत:
भरती आणि धर्मांतर रॅकेट: ठराविक कर्मचाऱ्यांच्या मदतीने नवीन भरती आणि धर्मांतराचे जाळे विणणे.
तक्रारींकडे दुर्लक्ष: पीडित महिलांनी मुस्लिम सहकाऱ्यांविरुद्ध तक्रार केली असता, निदा खानने त्याकडे दुर्लक्ष करून आरोपींना संरक्षण दिल्याचा आरोप आहे.
घृणास्पद प्रयत्न: हिंदू महिला कर्मचाऱ्यांना मुस्लिम पुरुष कर्मचाऱ्यांच्या जवळ आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचाही तिच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

कंपनीची महत्त्वाची पावले
या प्रकरणामुळे कंपनीच्या प्रतिमेला तडा बसला असून खबरदारी म्हणून प्रशासनाने मोठे निर्णय घेतले आहेत:
१. वर्क फ्रॉम होम: नाशिकमधील कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत घरून काम (WFH) करण्यास सांगितले आहे.
२. भरती प्रक्रिया स्थगित: नाशिक केंद्रावरील नवीन कर्मचारी भरती तात्पुरती थांबवण्यात आली आहे.
३. इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी: धर्मांतर आणि इतर कृत्यांसाठी कंपनीच्या लॅपटॉप किंवा इतर उपकरणांचा वापर झाला आहे का, याचीही फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे.

"आम्ही NIA आणि ATS कडे पत्रव्यवहार केला आहे. अद्याप परकीय निधीचे थेट पुरावे मिळालेले नाहीत, मात्र सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू आहे."
- पोलीस अधिकारी

Comments

No comments yet.