नाशिकच्या तिजोरीत महसुलाचा धबधबा... उत्पादन शुल्कात इतक्या टक्क्यांची विक्रमी झेप...

Share:
Main Image
Last updated: 03-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३ एप्रिल- नाशिक जिल्ह्यात उत्पादन शुल्क (Excise) महसूल वसुलीत अभूतपूर्व वाढ नोंदवली गेली असून गेल्या सहा वर्षांत महसूल दुप्पट होऊन विक्रमी स्तरावर पोहोचला आहे. 2020-21 ते 2025-26 या कालावधीत महसूलात तब्बल 106 टक्क्यांची वाढ झाली असून 2025-26 या आर्थिक वर्षात ₹7115.51 कोटींची आतापर्यंतची सर्वाधिक वसुली झाली आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार, 2020-21 या बेस वर्षात ₹3442.14 कोटी इतका महसूल होता. त्यानंतर दरवर्षी सातत्याने वाढ होत गेली. 2021-22 मध्ये 25.74 टक्के वाढीसह ₹4328.11 कोटी, 2022-23 मध्ये 22.92 टक्के वाढीसह ₹5320.06 कोटी महसूल जमा झाला. पुढे 2023-24 मध्ये ₹5627.49 कोटी आणि 2024-25 मध्ये ₹6133.82 कोटी इतकी वसुली झाली.

Advertisement

विशेष म्हणजे 2021-22 या वर्षात सर्वाधिक 25.74 टक्के वार्षिक वाढ नोंदवली गेली, तर 2025-26 मध्येही 15.99 टक्क्यांची लक्षणीय वाढ कायम राहिली. या सातत्यपूर्ण प्रगतीमुळे नाशिक जिल्ह्याने उत्पादन शुल्क महसुलात ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे.

या उल्लेखनीय यशामागे प्रभावी अंमलबजावणी, महसूल संकलनातील पारदर्शकता, तसेच प्रशासनाच्या काटेकोर नियोजनाचा मोठा वाटा असल्याचे मानले जात आहे. जिल्ह्याच्या आर्थिक बळकटीसाठी हा महसूल वाढीचा प्रवाह अत्यंत महत्त्वाचा ठरत असून आगामी काळातही ही वाढ कायम राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

Comments

No comments yet.