घरात शिरून तरूणीचे हात-पाय बांधले अन् केला बलात्कार... नाशकातील धक्कादायक प्रकार...

Share:
Main Image
Last updated: 01-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १ मार्च - शहरातील सिडको परिसरात एक संतापजनक घटना समोर आली आहे. घरात कोणीही नसल्याची संधी साधून एका नराधमाने तरूणीचे हात-पाय बांधून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी सिडको परिसरात राहते. संशयित आरोपी हर्षल रमेश परदेशी (वय १९, रा. बोरमळी-नागद, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि पीडिता हे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. गेल्या रविवारी (दि. २२) रात्री पीडिता आपल्या घरात झोपलेली असताना, घरात इतर कोणीही नसल्याचे पाहून हर्षलने तिथे प्रवेश केला.

ओढणीने बांधले हात-पाय
संशयिताने पीडितेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने याला कडाडून विरोध केला असता, नराधम हर्षलने पीडितेच्याच ओढणीच्या सहाय्याने तिचे हात आणि पाय बांधून टाकले. त्यानंतर तिच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला.

जीवे मारण्याची धमकी
अत्याचार केल्यानंतर संशयिताने पीडितेच्या गालावर चापट मारली आणि "या घटनेबाबत कोणालाही सांगितल्यास जीवे ठार मारीन," अशी धमकी देऊन तो पसार झाला. या धक्कादायक प्रकारामुळे पीडिता प्रचंड दहशतीखाली होती. मात्र, अखेर धाडस एकवटून तिने अंबड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली.

पोलीस तपास सुरू
पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी हर्षल परदेशी विरोधात बलात्काराचा आणि धमकी दिलल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सविता उंडे करत आहेत. शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा नराधमांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

नाशिक : चेहडी भागातील ४५ वर्षीय व्यक्तीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राजू पुंजा जाधव (रा.ताजनपुरे मळा चेहडी बु.सामनगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. जाधव यांनी सोमवारी (दि.२३) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होत. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यांना बिटको हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हारूग्णालयात दाखल केले होते. शनिवारी उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.