भरघोस नफ्याचे आश्वासन देत 90 लाखांना घातला गंडा...वाचा नेमके प्रकरण काय?

Share:
Last updated: 27-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २७ फेब्रुवारी - शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास भरघोस नफा मिळवून देण्याची हमी देत सायबर भामट्यांनी शहरातील तीन जणांना तब्बल ९० लाख ४७ हजार ७४४ रूपयांना गंडा घातला. पाच महिने उलटूनही मुद्दलसह नफ्याची रक्कम पदरात न पडल्याने तक्रारदारांनी पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील वेगवेगळ््या भागात राहणाºया तक्रारदारांची या प्रकरणात आर्थीक फसवणुक झाली आहे. गेल्या आॅक्टोबर महिन्यात भामट्यांनी तक्रारदारांशी संपर्क साधला होता. व्हॉटसअपवर चॅटींग करीत शेअर मार्केट ब्रोकर असल्याचे भासवून ही फसवणुक करण्यात आली. शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. विश्वास संपादन करीत भामट्यानी तक्रारदारांना वेगवेगळ्या बँक व वॅलेट खात्यात रकमा पाठविण्यास भाग पाडण्यात आले असून या प्रकरणात ९० लाख ४७ हजार  ७४४ रूपयांची आर्थीक फसवणुक करण्यात आली आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०२५ ते ११ नोव्हेंबर दरम्यान घडला असून गुंतवणुक आणि नफ्याची रक्कम पदरान न पडल्याने तक्रारदारांनी पोलीसात धाव घेतली आहे. वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे तपास करत आहेत.

नाशिक : सावरकर नगर भागात भरदिवसा धाडसी घरफोडी झाली. यात चोरट्यांनी तब्बला सहा लाख रूपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारला असून त्यात २० हजाराच्या रोकडसह अमेरिकन डॉलर आणि सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी गंगापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश नानाजी दळवी (रा.लक्ष्मी व्हिला ब्रम्हेचा कॉलनी, सावरकरनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दळवी कुटूंबिय गुरूवारी (दि.२६) दुपारी नेहमी प्रमाणे कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे लॅच लॉक तोडून घरात प्रवेश केला. घरात शिरलेल्या भामट्यांनी बेडरूममधील लाकडी कपाटात ठेवलेली २० हजाराची रोकड तसेच सुमारे २ लाख ७० हजार रूपये किमतीचे तीन हजार अमेरिकन डॉलर आणि सोन्याचांदीचे दागिणे असा ६ लाख ५ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.