येवल्यातही होणार कलाग्राम... बचतगटातील महिलांना असा होणार फायदा...

Share:
Main Image
Last updated: 19-Feb-2026

येवला, (प्रतिनिधी) १९ फेब्रुवारी - येवला विधानसभा मतदारसंघातील महिलांचे सक्षमीकरण करण्याचे पाउल आपण उचलले असून बचतगटांच्या महिलांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा त्याचाच एक भाग आहे. आगामी काळात महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी हक्काची बाजार पेठ व व्यासपीठ निर्माण करून देण्यात येईल असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले. तर नाशिकच्या कलाग्रामच्या धर्तीवर येवल्यात देखील असा प्रकल्प उभा करून महिलांना हक्काची बाजार पेठ निर्माण करण्यात येईल असे प्रतिपादन डॉ.शेफाली भुजबळ यांनी केले.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील बचतगटातील महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने बचतगट मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज माजी खासदार समीर भुजबळ व डॉ. शेफाली भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मुखेड गटामधील महिला बचत गटांना मार्गदर्शन व हळदी कुंकू समारंभ एरंडगाव येथील येथील वर्मा लॉन्स येथे तर येवला शहरातील महिलांसाठी माउली लॉन्स येथे पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. 

यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी,  विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, शहराध्यक्ष दत्ता निकम, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, नगरसेविका पारूल गुजराथी, नगरसेवक दीपक लोणारी, नगरसेवक गोटू मांजरे, नगरसेवक अमजद शेख, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, नितीन गायकवाड, गुड्डू जावळे, संजय पागार, भगवान ठोंबरे, अल्केश कासलीवाल, सुनील पैठणकर, तुळशीराम कोकाटे, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, संतोष खैरनार, महिला शहराध्यक्ष राजश्री पहिलवान, सविता धनवटे, संध्या पगारे, उज्ज्वला पैठणकर,कल्पनाताई कापडी, दिपक गायकवाड,शफिक शेख, भूषण लाघवे, सचिन सोनवणे, पार्थ कासार, वाल्मिक कुमावत,प्रीतम शहारे, क्लस्टर कोऑर्डीनेटर प्रतिक तुपकर, श्रीमती सुषमा विखे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, येवला मतदारसंघातील जनता मंत्री छगन भुजबळ यांच्या विकासाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे आज येवल्यात अनेक महत्वपूर्ण विकासाची कामे मतदारसंघात करण्यात झाली असून येवल्याचा कायापालट झाला आहे. येणाऱ्या काळात बचतगटातील महिलांच्या सक्षमीकरणाचे पाउल आपण उचलले आहे. शासन तसेच इतर माध्यमातून बचतगटांना अधिक मदत उपलब्ध करून देऊन बचतगटांना सक्षम केले जाणार आहे. महिलांनी तयार केलेल्या मालाची विक्री करण्यासाठी हक्काची बाजार पेठ निर्माण केली जाईल. तसेच मतदारसंघातील महिलांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले जाईल असे त्यांनी सांगितले.  

यावेळी डॉ.शेफाली भुजबळ म्हणाल्या की, मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून बचतगटातील महिलांना हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी कलाग्रामची निर्मिती केली आहे. तसेच येवल्यात रेशीम पार्क निर्मितीसाठी कार्यवाही सुरु असून चिचोंडी औद्योगिक वसाहतीक कांदा प्रक्रिया उद्योग मंजूर करून घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार व त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ निर्माण करून देण्यात येणार आहे. बचतगटातील महिलांना योग्य मार्गदर्शन, निर्माण केलेल्या वस्तूची विक्री व्यवस्थापन, हक्काची बाजारपेठ व एकत्र येण्यासाठी कार्यालय हे सर्व एकाच ठिकाणी निर्माण करण्याचा आपला मानस आहे. त्यादृष्टीने कार्यवाही देखील सुरु आहे. येवला तालुक्यातील रायते येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून १.५० कोटी रुपये निधीतून नुतून वास्तूची निर्मिती केली जात आहे. त्याचप्रमाणे मतदारसंघात विविध ठिकाणी बचतगट केंद्र आणि शहराच्या ठिकाणी मोठा प्रकल्प उभा करून बचतगटांच्या उत्पादनांना अधिक चालना देऊन महिलांना रोजगार निर्मिती केली जाईल असे त्यांनी सांगितले. 

यावेळी दृक्षश्राव्य माध्यमातून मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित महिलांना मागर्दर्शन केले. ते म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने बचतगटातील महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्यात देण्याचा आपला प्रयत्न आहे. या माध्यमातून महिलांना योग्य मार्दर्शन प्रशिक्षण देऊन नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. या उपक्रमातून महिलांना स्वतःची ओळख निर्माण करू शकणार आहे. त्यातून त्या आपले उज्ज्वल भविष्य निर्माण करू शकतील. रायते येथे सुमारे दीड कोटी रुपये निधीतून महिलांना इमारत निर्माण करून देण्यात येऊन हक्काचे व्यासपीठ निर्माण केले जात आहे. मतदारसंघात इतरही ठिकाणी महिलाना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले जाईल असे सांगत महिलांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी झी मराठी फेम अभिनेते संदीप जाधव व अभिजीत बगदे यांनी होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या माध्यमातून खेळ पैठणीचा तसेच विविध मनोरंजनाचे खेळ घेतले. या खेळात सहभागी होऊन विजयी झालेल्या महिलांना विविध बक्षिसे देण्यात आली. यामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ज्ञानेश्वर दराडे व डॉ.नागेश गवळी यांनी केले.

Advertisement

Comments

No comments yet.