महिला सक्षमीकरणाचा 'नवहितगुज' पॅटर्न... गरजू महिलांना केली ही अभिनव मदत...

Share:
Main Image
Last updated: 18-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १८ फेब्रुवारी - "जेव्हा एखादी महिला दुसऱ्या महिलेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते, तेव्हा समाज बदलायला वेळ लागत नाही. एका महिलेचा हात बळकट करणे म्हणजे संपूर्ण कुटुंब सक्षम करणे होय," हा उदात्त विचार उराशी बाळगून नाशिकमधील 'नवहितगुज महिला मंडळा' तर्फे समाजातील गरजू, विधवा आणि निराधार महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी मदतीचा हात देण्यात आला. मंडळाच्या विशेष सभेत १३ शिलाई व पिको-फॉल मशीन तसेच एका फेशियल चेअरचे यशस्वी हस्तांतरण करण्यात आले.

मदतीचा ओघ आणि भाऊक क्षण
मंडळाच्या माजी अध्यक्ष संध्या कोठावदे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, "आमच्याकडे मदतीसाठी अनेक अर्ज येत आहेत. जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी समाजातील दात्यांनी स्वतःहून पुढे येऊन निधी उपलब्ध करून द्यावा."
अध्यक्षीय भाषणात प्रतिभा वाणी म्हणाल्या की, "मदतीसाठी आलेल्या महिलांच्या संघर्षाची कहाणी ऐकताना आमचेही डोळे पाणावले. कुणी मुलांच्या शिक्षणासाठी तर कुणी संसारासाठी एकटीने झुंज देत आहे. ही शिलाई मशीन त्यांच्या आयुष्यात स्वाभिमानाने जगण्याचा नवा आशेचा किरण ठरेल."

मान्यवरांची उपस्थिती आणि नियोजन
या सोहळ्याला श्रेयस फॅब टेकचे संचालक श्रेयस पटेल, सीए अनिल कोठावदे, महेंद्र शेवाळे, अनिता व गोपी गिलबिले, प्रा. बी. एस. वाणी सर, विदुला धामणे यांच्यासह ३५० हून अधिक महिला सदस्य उपस्थित होत्या. समिती प्रमुख नयना अमृतकर यांनी पारदर्शक निवड प्रक्रियेची माहिती दिली, तर वैशाली कोठावदे यांनी लाभार्थी महिलांचा परिचय करून दिला.

२०२६-२७ ची नूतन कार्यकारिणी घोषित
याच विशेष सभेत मंडळाची आगामी वर्षासाठीची (२०२६-२७) नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली:
अध्यक्ष: प्रतिभा वाणी
उपाध्यक्ष: प्रणाली बागड
सचिव: चारू शिरोडे
सहसचिव: रुपाली येवले
खजिनदार: लीना बागड
सहखजिनदार: सीमा सोनजे
सल्लागार: उज्ज्वला कोठावदे व संध्या कोठावदे
याशिवाय ज्योत्स्ना मोराणकर, सरिता शिरोडे, पल्लवी वेढणे यांच्यासह १० संचालिका आणि ५ निमंत्रित संचालिकांची निवड करण्यात आली आहे.

कार्यक्रमाची इतर वैशिष्ट्ये:
इतिवृत्त वाचन: प्रणाली बागड
जमा-खर्च सादरीकरण: रुपाली येवले
सूत्रसंचालन: सरिता शिरोडे
समिती कामकाज: प्रांजल कोठावदे, सुनीता वाणी, श्वेता सोनजे.

Advertisement

Comments

No comments yet.