महाशिवरात्रीला त्र्यंबकराजाच्या दर्शनाबाबत देवस्थानचा मोठा निर्णय...

Share:
Main Image
Last updated: 14-Feb-2026

त्र्यंबकेश्वर, (प्रतिनिधी) १४ फेब्रुवारी - येत्या १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाशिवरात्री उत्सवासाठी श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने कंबर कसली असून, भाविकांच्या नियोजनासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यंदा गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि सर्वसामान्य भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी 'व्हीआयपी' तसेच 'देणगी दर्शन' पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे.

दर्शनाचे वेळापत्रक आणि नियम
अखंड दर्शन: रविवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजल्यापासून ते सोमवार, दि. १६ फेब्रुवारी रात्री ९ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी सलग उघडे राहील.
प्रवेश द्वार: सर्व भाविकांना पूर्व दरवाजा दर्शन बारीतूनच प्रवेश दिला जाईल.
स्थानिकांसाठी तरतूद: १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान सकाळी मंदिर उघडल्यापासून ते १०:३० वाजेपर्यंत त्र्यंबक येथील स्थानिकांना आधारकार्ड दाखवून पश्चिम द्वाराने प्रवेश मिळेल. त्यांच्यासाठी उत्तर द्वारातून (जाळीचा दरवाजा) दर्शनाची व्यवस्था असून, निकास दक्षिण गेटने (गायत्री गेट) असेल. स्थानिकांसोबत पाहुण्यांना या मार्गाने प्रवेश मिळणार नाही.
भक्ती आणि कलेचा त्रिवेणी संगम: ३ दिवस सांस्कृतिक मेजवानी
देवस्थानने यंदा दर्शनासोबतच भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे:
१४ फेब्रुवारी: ज्येष्ठ गायक व संगीतकार श्रीधर फडके यांचा सुप्रसिद्ध 'गीत रामायण' हा कार्यक्रम सायंकाळी ७ ते ९:३० या वेळेत होईल.
१५ फेब्रुवारी (महाशिवरात्री): दुपारी ३ वाजता त्र्यंबकराजांची पालखी कुशावर्त तीर्थाकडे प्रस्थान करेल. सायंकाळी ५ वाजता लघुरुद्र अभिषेक होईल. रात्री ११ वाजता मुख्य महापूजा आणि अंतर्गत पालखी सोहळा पार पडेल. विशेष आकर्षण म्हणजे 'शिव-तांडव' ग्रुपतर्फे मंदिराच्या पटांगणात 'अघोर नृत्य' सादर केले जाईल.
१६ फेब्रुवारी: सायंकाळी ६ वाजेपासून प्रिया दीक्षित व ग्रुप, कलानंद कथ्थक नृत्य संस्था, कलाध्यास ग्रुप आणि ओम नटराज अकॅडमी यांचे बहारदार शास्त्रीय नृत्याविष्कार सादर होतील.

"भाविकांनी गर्दीचे भान राखून प्रशासनाला सहकार्य करावे. नियमांचे पालन करून त्र्यंबकराजाचे दर्शन घ्यावे, असे आवाहन श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे."

 

'सुपरफास्ट नाशिक'चे मुख्य संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक भावेश ब्राह्मणकर यांचे 'अरुणोदय' पुस्तक प्रकाशन पूर्व बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहे.
प्रथितयश दिलीपराज प्रकाशनाने २५ टक्के घसघशीत सूट त्यासाठी दिली आहे. 
पुस्तक बुकिंगसाठी खालील लिंकवर क्लिक करावे

https://www.diliprajprakashan.in/products/arunoday-by-bhavesh-brahmankar

Advertisement

Comments

No comments yet.