चोरट्यांनाही चांदीची भुरळ... ज्वेलर्स दुकानातून सव्वा लाखांचे पैंजण लांबवले...

Share:
Last updated: 13-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १३ फेब्रुवारी - खरेदीच्या बहाण्याने सराफी दुकानात शिरलेल्या भामट्या महिलांनी सुमारे सव्वा लाख रूपये किमतीचे चांदीचे पैंजण चोरून नेले. ही घटना औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मण मधुकर पवार (रा.सिरीन मिडोज गंगापूररोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पवार यांचे शिवाजीनगर भागातील पोलीस चौकी पाठीमागे पवार ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. बुधवारी (दि.११) सकाळच्या सुमारास पवार आपला व्यवसाय सांभाळत असतांना ही घटना घडली. खरेदीच्या बहाण्याने दुकानात शिरलेल्या दोन महिलांनी ही चोरी केली. चांदीचे पैंजण बघत असतांना पवार यांना बोलण्यात गुंतवून भामट्या महिलांनी हात की सफाई केली असून या घटनेत १ लाख १० हजार रूपये किमतीचे चांदीचे पैंजण हातोहात लांबविण्यात आले आहेत. दुकानातून महिला निघून गेल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आल्याने पवार यांनी पोलीसात धाव घेतली असून हवालदार पाटील तपास करीत आहेत.

नाशिक : उघड्या घरात शिरून चोरट्यांनी कपाटात ठेवलेली सुमारे ५० हजार रूपये किमतीची सोन्याची पोत चोरून नेली. हा प्रकार बेलतगव्हाण ता.जि.नाशिक येथे घडला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बालासाहेब राजाराम सातपुते (रा.माऊली नगर, पाळदेमळा बेलतगव्हाण,ना.रोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सातपुते कुटूंबिय सोमवारी (दि.९) सायंकाळच्या सुमारास आप आपल्या कामात व्यस्त असतांना अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात शिरून ही चोरी केली. घरात शिरलेल्या भामट्यांनी कपाटातील ड्रावरमध्ये ठेवलेली सोन्याची पोत चोरून नेली. हवालदार भोळे तपास करीत आहेत.

 

'सुपरफास्ट नाशिक'चे मुख्य संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक भावेश ब्राह्मणकर यांचे 'अरुणोदय' पुस्तक प्रकाशन पूर्व बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहे.
प्रथितयश दिलीपराज प्रकाशनाने २५ टक्के घसघशीत सूट त्यासाठी दिली आहे. 
पुस्तक बुकिंगसाठी खालील लिंकवर क्लिक करावे

https://www.diliprajprakashan.in/products/arunoday-by-bhavesh-brahmankar

Advertisement

Comments

No comments yet.