नाशिक, (प्रतिनिधी) १२ फेब्रुवारी - नाशिकच्या पोलीस अकादमीसमोरील जागा शासनजमा करण्याचे चांगले काम महसूल विभागाने केले असून या जागेवर मध्यवर्ती प्रशासकीय संकुल उभारून सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्याची मागणी राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज राज्य नियोजन आराखडा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना बैठकीत दिले.
त्र्यंबक रोडवरील पोलिस प्रशिक्षण केंद्रासमोरील पीटीसी समोरील जागेचे सर्व व्यवहार बेकायदेशीर ठरवत ही जमीन शासनजमा करण्याची महसूल विभागाने नुकतीच कारवाई केली.
बुधवार दि. ११ रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राज्याचे अन्न,नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी हा मुद्दा उपस्थित करत या कारवाईबद्दल महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, महसूल प्रशासनाने नाशिकमध्ये मोठी कारवाई केली आहे. आता या जागेवर मध्यवर्ती प्रशासकीय संकुल उभारण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्र्यांनी भुजबळ यांच्या मागणीवर तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना दिले. त्यामुळे आता या जागेवर मध्यवर्ती प्रशासकीय संकुल उभारण्यासंदर्भात हालचाली गतीमान झाल्या आहेत.
'सुपरफास्ट नाशिक'चे मुख्य संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक भावेश ब्राह्मणकर यांचे 'अरुणोदय' पुस्तक प्रकाशन पूर्व बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहे.
प्रथितयश दिलीपराज प्रकाशनाने २५ टक्के घसघशीत सूट त्यासाठी दिली आहे.
पुस्तक बुकिंगसाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://www.diliprajprakashan.in/products/arunoday-by-bhavesh-brahmankar