वाह रे बहाद्दर... वकिलाच्याच गाळ्यावर केला कब्जा...

Share:
Last updated: 10-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १० फेब्रुवारी - वकिलाच्या गाळ्यावर एकाने बेकायदेशीर कब्जा केल्याचा प्रकार समोर आला आहे. पहिले तोडून दुसरे कुलूप लावल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ गजाराम देवरे (रा.जेलरोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. निखील महेश अग्रवाल (रा.एसबीआय बँकेसमोर सिबीएस) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अग्रवाल यांचा वकिलीचा व्यवसाय असून त्यांचा मालकिचा वावरे लेन भागातील शिवनेरी कॉम्प्लेक्स या व्यापारी संकुलात गाळा आहे. गेल्या १८ डिसेंबर ते २ फेब्रुवारी दरम्यान संशयिताने अग्रवाल यांच्या गाळ्यास लावलेले कुलूप तोडून कब्जा करण्यासाठी स्व:ताचे कुलूप ठोकल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. हवालदार बोळे तपास करीत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.