पायी जाणाऱ्या तरुणीचा हातच पकडला...

Share:
Last updated: 10-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १० फेब्रुवारी - महिलेस मारहाण करीत एकाने तरूणीचा विनयभंग केला. हा प्रकार औद्योगीक वसाहतीतील टेक्नोफोर्स कंपनी भागात घडला असून, या घटनेत महिलेस लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याने ती जखमी झाली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोशन बहिरू गोवर्धने असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. परिसरात राहणाऱ्या मायलेकी गेल्या रविवारी (दि.१) सकाळच्या सुमारास अंबड गावात भाजीपाला खरेदी करण्यासाठी जात असतांना ही घटना घडली. रस्त्याने पायी जात असतांना परिचीत संशयिताने महिलेच्या मुलीचा हात पकडून विनयभंग केला. यावेळी महिलेने त्यास जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता संतप्त संशयिताने हातातील लोखंडी रॉडने महिलेस मारहाण केली. हवालदार सोमनाथ झोले तपास करीत आहेत.

नाशिक : रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेली. ही घटना गंगापूररोडवरील पाईपलाईन रोड भागात घडली. या घटनेत सुमारे एक लाख ४० हजार रूपये किमतीच्या सोन्याच्या पोतीवर चोरट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चित्रा कैलास बच्छाव (रा.निलम पार्क रो हाऊस,विवेकानंद नगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बच्छाव सोमवारी (दि.९) सायंकाळी परिसरातील गिरणीत दळण दळण्यासाठी गेल्या होत्या. दळण ठेवून त्या आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. रस्त्याने पायी जात असतांना पाठीमागून आलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील पोत बळजबरीने हिसकावली या वेळी बच्छाव यांनी आरडाओरड केला असता समोरून दुचाकीवर आलेल्या व्यक्तीने चोरट्यास डबलसिट बसवून संत कबीरनगरच्या दिशेने पोबारा केला. उपनिरीक्षक शरद पाटील करीत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.