नाशिक, (प्रतिनिधी) २२ डिसेंबर - शहरात वाहनचोरांचा धुमाकूळ सुरू असून वेगवेगळ्या भागात पार्क केलेल्या मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी म्हसरूळ, मुंबईनाका, गंगापूर ,सरकारवाडा व उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
समर्थ नगर येथील शेखर कारभारी मोहिते (रा.स्वरगंगा सोसा. किशोर सुर्यवंशी मार्ग) यांची एमएच १५ एफजे २४२१ मोटारसायकल शनिवारी (दि.२०) रात्री परिसरातील पांजरा ६ सोसायटीच्या आवारात लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली असून अधिक तपास अंमलदार के.के. बागुल करीत आहेत. दुसरी चोरीची घटना आनंदवली भागात घडली. अतिक अहमद काजी (रा.बिरोबा मंदिराजवळ,आनंदवली) याची स्प्लेंडर एमएच १५ जीके ९४६२ गेल्या रविवारी (दि.१४) रात्री त्यांच्या राहते घरासमोर लावलेली असताना चोरट्यांनी ती पळवून नेली. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार पाटील करीत आहेत.
तिसरी घटना मुंबईनाका भागात घडली. हनुमान दादा मोराडे (रा.काठेगल्ली,द्वारका) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मोराडे शनिवारी (दि.२०) सकाळच्या सुमारास मुंबईनाका भागात गेले होते. राष्ट्रवादी कॉग्रेस (शरदपवार गट) कार्यालया बाहेर लावलेली त्यांची अॅक्टीव्हा एमएच १५ केएम ५५४९ चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात चोरीची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत. चौथी घटना कॅनडा कॉर्नर भागात घडली. गोविंदसिह जगदिशसिंह पवार (रा.मिशन मळा, शरणपूररोड) यांनी फिर्याद दिली आहे. पवार यांची अॅक्टीव्हा एमएच १५ ईझेड ९८६९ गेल्या शनिवारी (दि.१३) त्यांच्या घर परिसरात पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. तर पाचवी घटना याच भागातील शरणपूररोड भागात घडली. प्रिती महेश पाटील (रा.अलोक अपा. राका कॉलनी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पाटील यांची एमएच १५ सीवाय ६१२४ मोटारसायकल गेल्या शनिवारी (दि.१३) रात्री त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. दोन्ही घटनांप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या नोंदी करण्यात आल्या असून अधिक तपास हवालदार थेटे करत आहेत. तर संकेत विजय थोरात (रा.पळसकर चाळ चेहडी जकात नाका) हे शनिवारी (दि.२०) नाशिकरोड भागात गेले होते. दत्तमंदिर सिग्नल भागातील राजन कॉम्प्लेक्स या इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेली त्यांची पल्सर एमएच १५ जीवाय ७९१२ चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार शेजवळ करीत आहेत.
समाजकंटकांनी दुचाकी पेटवली
नाशिक - सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी समाजकंटकानी पेटवून दिल्याची घटना आडगाव शिवारातील जत्रानांदूर लिंकरोड भागात घडली. या घटनेत मोटारसायकल खाक झाली असून मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरती आकाशबाब बिडकर (रा. श्रीमंत योगी सोसा.वृंदावननगर) या युवतीने याबाबत फिर्याद दिली आहे. मूळची जालना जिह्यातील बिडकर ही तरूणी शहरातील नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. रविवारी (दि.२१) रात्री अज्ञात समाजकंटकांनी त्यांची सोसायटीच्या आवारात लावलेली अॅक्टीव्हा एमएच २१ बीटी १३८१ ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिली. या घटनेत दुचाकी जळून खाक झाली असून मोठे नुकसान झाले आहे. अधिक तपास हवालदार आहिरे करीत आहेत.