येवला, दि.२१ डिसेंबर (प्रतिनिधी) - राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या विकासावर येवलेकरांनी शिक्कामोर्तब केले आहे. आगामी काळात येवला शहराचा सर्वांगीण विकासासाठी प्राधान्य असणार असून येवला शहर हे राज्यातील रोड मॉडेल शहर म्हणून विकसित करण्यात येईल असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यात केलेल्या विकासाला येवलेकरांनी भक्कम पाठिंबा दिला असून माजी खासदार समीर भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, भाजप, रिपाई मित्रपक्ष महायुतीला येवला नगरपालिकेत मोठे यश प्राप्त झाले आहे. यामध्ये नगराध्यक्ष पदी राजेंद्र लोणारी यांचा ११६५ विक्रमी मतांनी दणदणीत विजय झाला असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ११ व भाजपचे ३ असे महायुतीचे एकूण १४ उमेदवार विजयी झाले आहे.
या विजयानंतर माजी खासदार समीर भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्याचा आजवर जो विकास केला आहे. त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. यंदाच्या निवडणुकीत मंत्री छगन भुजबळ साहेब हे अनुपस्थित असल्याने सर्व निवडणूक ही कार्यकर्त्यांनी हातात घेतली. या निवडणुकीत मिळालेले हे यश कार्यकर्त्यांनी घेतलेल्या विशेष मेहनतीचे यश आहे. आगामी काळात येवल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण अधिक प्राधान्य देणार असून विविध विकासाची कामे यापुढील काळात मार्गी लावली जातील तसेच येवला शहराच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे सांगत सर्व येवलेकरांचे व अविरत काम करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानतो असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आमदार पंकज भुजबळ म्हणाले की, मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवल्यामध्ये अनेक विकासाची कामे झाली आहे. त्यांच्या या विकासाच्या कामांवर येवल्यातील जनतेने विश्वास ठेवत पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. यापुढील काळात मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी व महायुतीच्या सर्व उमेदवार येवल्याच्या विकासासाठी अविरतपणे काम करतील. तसेच येवलेकरांनी मंत्री छगन भुजबळ व भुजबळ कुटुंबावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल सर्व येवलेकरांचे आभार मानतो असे त्यांनी म्हटले आहे.
येवला नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे उमेदवार राजेंद्र लोणारी यांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे येवला शहरात महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, विजयानंतर शहरभर जल्लोष साजरा करण्यात आला. या निवडणुकीत येवला शहरातील मतदारांनी विकास, पारदर्शक प्रशासन आणि सक्षम नेतृत्वाला मत दिले, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून येवला शहराचा केलेला विकास आणि त्यांनी येवलेकरांना आगामी काळासाठी दाखवलेले विकासाचे व्हिजनसाठी येवलेकरांनी त्यांना भरभरून पाठिंबा दिला आहे.
माजी खासदार समीर भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांनी निवडणूक काळात केलेले संघटन, कार्यकर्त्यांशी थेट संवाद व विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून केलेली प्रचाराची रणनीती यामुळे हा विजय शक्य झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, संभाजी पवार,धनंजय कुलकर्णी, बंडू शिरसागर ,येवला विधानसभा अध्यक्ष वंसत पवार, हुसेन शेख,साहेबराव मढवई, दत्ता निकम, राजेश भांडगे,मोहन शेलार, संजय बनकरनितीन गायकवाड, रतन बोरनारे, प्रा.ज्ञानेश्वर दराडे,सचिन कळमकर, मकरंद सोनवणे,डॉ.प्रविण बुल्हे, सचिन सोनवणे,मलिक मेंबर, भगवान ठोंबरे,दिपक गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
येवला नगरपालिका निवडणुकीत माजी खासदार समीर भुजबळ ठरले किंगमेकर
येवला नगरपालिका निवडणुकीत माजी खासदार समीर भुजबळ यांनी बजावलेली निर्णायक भूमिका हीच या निवडणुकीची सर्वाधिक चर्चेची बाब ठरली असून, राजकीय वर्तुळात त्यांची ओळख पुन्हा एकदा ‘किंगमेकर’ म्हणून अधोरेखित झाली आहे. नगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या विजयामागे समीर भुजबळ यांनी आखलेली अचूक रणनीती, बूथनिहाय नियोजन, कार्यकर्त्यांशी थेट संवाद आणि स्थानिक प्रश्नांवर आधारित प्रचार ही महत्त्वाची कारणे ठरली. निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी प्रत्यक्ष लक्ष घालून निर्णय घेतल्यामुळे महायुतीला अपेक्षित संख्याबळ मिळाले.
मंत्री छगन भुजबळ यांच्या विकासात्मक राजकारणाचा विश्वास जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम समीर भुजबळ यांनी प्रभावीपणे केले. त्याचबरोबर आमदार पंकज भुजबळ यांच्या समन्वयातून संघटन अधिक मजबूत झाले. या निवडणुकीत अनेक प्रभागांमध्ये चुरशीची लढत असतानाही महायुतीने बाजी मारली, याचे श्रेय समीर भुजबळ यांच्या अनुभवसंपन्न नेतृत्वाला दिले जात आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजेंद्र लोणारी यांचा विजय हा या यशाचा कळस ठरला. या निकालामुळे येवला शहराच्या राजकारणात समीर भुजबळ यांचे वजन वाढले असून, आगामी स्थानिक व विधानसभा स्तरावरील राजकारणावरही या विजयाचा दूरगामी परिणाम होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
महायुतीचे हे उमेदवार झाले विजयी....
नगराध्यक्ष पदी
राजेंद्र लोणारी – राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी
नगरसेवक
प्रभाग क्र. १ ब - परवीन शेख (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)
प्रभाग क्र. ५ अ – जयाबाई जाधव (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)
प्रभाग क्र. ५ ब - जावेद मोमीन (लखपती) (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)
प्रभाग क्र. ६ अ - लक्ष्मीबाई जावळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)
प्रभाग क्र.७ अ - प्रविण बनकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)
प्रभाग क्र.८ अ - छाया क्षीरसागर (भाजप)
प्रभाग क्र.८ ब - दिपक लोणारी (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)
प्रभाग क्र.१० अ - पारुल गुजराथी (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)
प्रभाग क्र.१० ब - महेश काबरा (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)
प्रभाग क्र.११ ब - कुणाल परदेशी (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)
प्रभाग क्र.१२ अ - लक्ष्मी साबळे (भाजप)
प्रभाग क्र.१२ ब - शंकर (गोटू) मांजरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)
प्रभाग क्र.१३ अ - पुष्पा गायकवाड (भाजप)
प्रभाग क्र.१३ ब - चैताली शिंदे (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)