नाशिक, (प्रतिनिधी) दि. 19 डिसेंबर : जिल्ह्यातील सिन्नर (२-अ, ४-अ, १०-ब), ओझर (१-अ व ८-ब) आणि चांदवड नगरपरिषदेच्या (३-अ) अशा सहा जागांसाठी शनिवार, २० डिसेंबर, २०२५ रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातील मतदार यादीतील अधिकारी, कर्मचारी, कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांची सवलत जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी निर्गमित केले आहेत.
सदरची सवलत उद्योग, ऊर्जा व कामगार विभागात येणाऱ्या आस्थापना, कारखाने, दुकाने आदींना लागू राहील. त्यात राज्य, केंद्र शासन व खासगी कंपन्यांमधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल, रिटेलर्स आदींना हा नियम लागू राहील.