मुंबई, (प्रतिनिधी) १५ जानेवारी - टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम)ने आज टोयोटा ड्रीम कार आर्ट कॉन्टेस्ट (टीडीसीएसी)च्या १९व्या एडिशनची घोषणा केली. टोयोटा मोटर कॉर्पोरेशन जपानची संकल्पना असलेला हा प्रमुख जागतिक उपक्रम कल्पनाशक्तीला वाव देतो आणि भावी गतीशीलता नवप्रवर्तकांना प्रेरित करतो. ही स्पर्धा भारतातील १५ वर्षे व त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी १२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत खुली असेल, जेथे तरूण विचारवंतांना सर्जनशीलता व कलेच्या क्षमतेच्या माध्यमातून भावी वाहनांची संकल्पना, डिझाइन व चित्र सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळेल.
टोयोटा ड्रीम कार आर्ट कॉन्टेस्ट ९० हून अधिक सहभागी देशांमध्ये राष्ट्रीय स्तरावर आयोजित केली जाते. या स्पर्धेत भारतातील विजेते जागतिक वर्ल्ड कॉन्टेस्टमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पुढे जातात. नॅशनल कॉन्टेस्टमध्ये विविध वयोगटांतील विजेत्यांना सन्मानित केले जाणार असून, त्यामध्ये ७ वर्षे व त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी श्रेणी १, ८ ते ११ वर्षे वयोगटासाठी श्रेणी २ आणि १२ ते १५ वर्षे वयोगटासाठी श्रेणी ३ अशा प्रत्येकी तीन विजेत्यांचा समावेश असेल.
सहभागींना थीम 'युअर ड्रीम कार'अंतर्गत त्यांची कलाकृती सबमिट करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ही थीम अबाधित सर्जनशीलतेला प्रेरित करते, तसेच मुलांना मुक्तपणे विचार करण्यास, साहसासह नाविन्यता आणण्यास आणि कोणत्याही मर्यादांशिवाय भावी गतीशीलतेबाबत कल्पना करण्यास प्रेरित करते. टॉप ९ विजेत्यांना (प्रत्येक श्रेणीमधून तीन) सहभाग प्रमाणपत्र मिळेल, तसेच मार्च २०२६ नंतर आयोजित करण्यात येणाऱ्या ग्लोबल कॉन्टेस्टमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्याचा सन्मान देखील मिळेल. याव्यतिरिक्त, १८ फायनलिस्ट्सना त्यांच्या सर्जनशील उत्कृष्टतेच्या सन्मानार्थ डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येतील.
याप्रसंगी मत व्यक्त करत टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या सेल्स-सर्विस-युज्ड कार बिझनेसचे कार्यकारी उपाध्यक्ष श्री. साबरी मनोहर म्हणाले, ''टोयोटा ड्रीम कार आर्ट कॉन्टेस्टमधून आमचा अतूट विश्वास दिसून येतो की, कल्पनाशक्ती नाविन्यतेचे प्रारंभिक उगमस्थान आहे. हा उल्लेखनीय वार्षिक उपक्रम मुलांच्या असाधारण क्षमता प्रशंसित करतो, तसेच त्यांना त्यांच्या कलेच्या माध्यमातून सर्वोत्तम, स्मार्ट अधिक शाश्वत भविष्याबाबत विचार करण्यास प्रेरित करतो. आम्ही १९वे एडिशन सादर करत असताना भारतभरातील मुलांच्या नवीन संकल्पना व अमर्यादित कल्पनाशक्तीला पाहण्यास उत्सुक आहोत, ज्यांचे दृष्टिकोन गतीशीलतेच्या भविष्याला निर्धारित करण्यामध्ये योगदान देईल.''
मागील एडिशन्समध्ये भारतातील सहभागींना त्यांच्या कल्पकतेसाठी उल्लेखनीय जागतिक मान्यता मिळाली आहे. २०२४ मध्ये १७व्या एडिशनमध्ये विशाखापट्टणममधील पेरूरी लक्ष्मी सहस्राने ग्लोबल कॉन्टेस्टमधील १२ ते १५ वर्ष वयोगटाच्या श्रेणीमध्ये प्रतिष्ठित बेस्ट फायनलिस्ट अवॉर्ड मिळवला, ज्यासह या आंतरराष्ट्रीय सर्जनशील प्लॅटफॉर्मवर भारताची उपस्थिती अधिक दृढ झाली आहे. हे यश सर्जनशीलतेला निपुण करण्याप्रती, तसेच भावी पिढीला साहसाने स्वप्न पाहण्यास व कोणत्याही मर्यादांशिवाय नाविन्यता आणण्यास सक्षम करण्याप्रती टोयोटाची कटिबद्धता अधिक दृढ करते.