नाशिक, (प्रतिनिधी) १३ जानेवारी - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 1 व 2 ची अंतरिम उत्तरसूची 19 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. याबाबत असलेले त्रुटी व आक्षेपाबाबत 19 डिसेंबर 2025 पर्यंत निवेदन नोंदविण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार विहित मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेवून अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे च्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
या अंतिम उत्तर सूचीबाबत कोणतेही निवेदन/ आक्षेप स्वीकराले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच अंतिम उत्त रसूचीनुसार MAHATET 2025 परीक्षेचा निकाल यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.