सावधान ! त्र्यंबकेश्वरच्या संत निवृत्तीनाथ यात्रेला इतके लाख भाविक येण्याचा अंदाज...

Share:
Main Image
Last updated: 13-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १३ जानेवारी - त्र्यंबकेश्वर जि. नाशिक येथे संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांची यात्रा दि. 14 व 15 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. या यात्रेसाठी अंदाजे 4 ते 5 लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असून, कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.

सध्या त्र्यंबकेश्वर-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने, यात्रेच्या कालावधीत खासगी वाहनांच्या वाढीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यात्रेस येणारे सर्व वारकरी, भाविक, यात्रेकरू व नागरिकांनी आपल्या खासगी वाहनांनी यात्रेस येणे टाळावे व सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनामार्फत उप घटना नियंत्रक अधिकारी तथा त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार गणेश जाधव यांनी  प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे

प्रशासनाकडून यात्रेसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थचे बळकटीकरण करण्यात आले असून, एस.टी. महामंडळामार्फत सुमारे 230 हून अधिक बस कुंभमेळा बसस्थानक येथून  तसेच परिसरातील आगारांतून त्र्यंबकेश्वरकडे नियमितपणे सोडण्यात येणार आहेत. याची यात्रेस येणाऱ्या सर्व वारकरी, भाविक, यात्रेकरू व नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही तहसीलदार जाधव यांनी म्हटले आहे.

Comments

No comments yet.