नाशिक, (प्रतिनिधी), दि. १२ जानेवारी २०२६ - नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग ३ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अंबादास खैरे यांनी आपला निवडणूक वचननामा जाहीर केला आहे. केवळ आश्वासने न देता, सर्वसामान्यांच्या अडीअडचणींचा प्रत्यक्ष विचार करून तयार करण्यात आलेल्या या वचननाम्यामुळे मतदारांमध्ये अंबादास खैरे यांच्या नावाची मोठी चर्चा सुरू झाली आहे. "प्रभाग ३ ला 'मॉडेल प्रभाग' बनवणे हेच माझे ध्येय आहे," असा विश्वास खैरे यांनी व्यक्त केला.
थेट संवाद आणि स्वच्छतेवर भर
अंबादास खैरे यांनी आपल्या वचननाम्यात पारदर्शकतेला प्रथम प्राधान्य दिले आहे. निवडून आल्यानंतर दर आठवड्याला 'जनता दरबार' भरवून नागरिकांच्या समस्या जागेवरच सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच, 'स्वच्छ नाशिक' मोहिमेला बळ देण्यासाठी दर महिन्यात प्रभागात व्यापक विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे.
पायाभूत सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञान
प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी खैरे यांनी अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प मांडले आहेत:
- जॉगिंग ट्रॅक व पर्यावरण: डाव्या कालव्यालगत अत्याधुनिक जॉगिंग ट्रॅक साकारण्यात येईल.
- सौर ऊर्जा: चौकातील हायमास्ट दिवे आणि पथदीप सौर ऊर्जेवर आधारित करून विजेची बचत केली जाईल.
- स्मार्ट सेवा: महापालिकेच्या सेवा ऑनलाइन आणि मोबाईल ॲपवर उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच, तक्रारींसाठी स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक सुरू केला जाईल.
- वाहतूक व सुरक्षा: अपघात प्रवण क्षेत्र (Black Spots) शोधून उपाययोजना करणे, सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे आणि दाट वस्तीतील वीज तारा भूमिगत करण्यावर भर दिला जाईल.

व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष तरतूद
प्रभागातील शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी एक स्वतंत्र व भव्य 'फूल बाजार' मार्केट साकारण्याचे आश्वासन खैरे यांनी दिले आहे. तसेच, शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी त्यांची 'तारांगण' केंद्रात विशेष सहल आयोजित करण्याचा अनोखा उपक्रम त्यांनी वचननाम्यात समाविष्ट केला आहे.
मतदारांचा कौल खैरे यांच्याकडे
तात्पुरत्या घोषणा करण्याऐवजी घंटागाड्यांची संख्या वाढवणे, बस फेऱ्या वाढवणे, बस तिकीट दर माफक करणे आणि चौकांचे सुशोभिकरण करणे यांसारख्या जमिनीवरच्या प्रश्नांना खैरे यांनी हात घातला आहे. यामुळे प्रभागातील महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे.
"प्रभाग ३ चा सर्वांगीण विकास करणे ही माझी जबाबदारी आहे. १५ जानेवारी रोजी 'घड्याळ' या चिन्हासमोरील बटण दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करावे, जेणेकरून आपल्या प्रभागाच्या प्रगतीचा वेग मला वाढवता येईल."
— अंबादास खैरे (उमेदवार, प्रभाग ३, राष्ट्रवादी काँग्रेस)