नाशिक महापालिकेत 'राष्ट्रवादी'ची सत्ता आल्यास काय करणार? समीर भुजबळ यांनी अख्खा प्लॅनच सांगून टाकला...

Share:
Main Image
Last updated: 12-Jan-2026

 

नाशिक,(प्रतिनिधी) दि.१२ जानेवारी २०२६ नाशिक शहरामध्ये अफाट क्षमता आहेत्यातुलनेत नाशिकचा विकास सध्या होत नाहीयमात्रमहापालिकेत सत्ता येताच नाशिकच्या विकासाला वेग दिला जाईलदादासाहेब फाळके स्मारकात आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान साकारले जाईलनाशिक दर्शन बस पुन्हा सुरू केली जाईलप्रदूषण न करणाऱ्या कंपन्यांना नाशकात संधी दिली जाईल तसेच नाशिकची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी नाशिक मेट्रो साकारली जाईलअसा ठाम निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक समीर भुजबळ यांनी व्यक्त केलाविशेष मुलाखतीत ते बोलत होते.

माजी खासदार समीर भुजबळ पुढे म्हणाले कीआल्हाददायक वातावरणासाठी जगभर ख्यात असलेली नाशिक नगरी ही माझी कर्मभूमी आहेयाच नगरीने मला देशात नेतृत्व करण्याची संधी दिलीमाननीय छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात आपल्याला नाशिक आणखी अग्रेसर करायचे आहे२०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कितीतरी विकासकामे करायची आहेतअसंख्य सोयी-सुविधा निर्माण करतानाच हा ग्लोबल सोहळा निर्विघ्न संपन्न होईल यासाठी कटीबद्ध व्हायचे आहेआगामी दीड वर्षात आपल्याला हे शिवधनुष्य पेलायचे आहेत्यासाठी नाशिक महापालिकेत योग्य नेतृत्व आणि सक्षम सत्ताधारी हवेतमाननीय छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शना आणि संकल्पनेतून साकार झालेल्या प्रकल्पांची देखभाल उत्तम होणे आणि नवीन प्रकल्प साकारणे यासाठी उत्साही आणि सर्वोत्तम व्यक्तीची गरज आहेअसे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ पुढे म्हणाले कीनाशिक शहराचे अनेक प्रश्न आहेतमहापालिकेत अनेक वर्षांपासून नोकरभरती नाहीऑनलाईन कामकाजाचे बारा वाजले आहेतविकासकामांसाठी पैसा उपलब्ध नाहीउद्यानांची दुरवस्थामैदानांची अनुपलब्धतारस्त्यांची बिकट अवस्था अशा असंख्य समस्या आहेतया सर्वांवर आपल्याकडे तोडगा आहेज्या पद्धतीने येवला परिसराचा अक्षरशः कायापालट करण्यात आला तसेच नाशिकमध्ये घडवायचे आहेयापूर्वी आपण प्रत्यक्ष विकासकामे केलीत्यानंतर ती सांगितलीआताही आपण जे करणार आहोत तेच सांगत आहोतआता इथून पुढे आपल्याला अधिक गतीने आणि चौफेर विकासवारी घडवायची आहेशिक्षणआरोग्यपर्यटनस्वच्छतासाहित्य-संस्कृतीक्रीडामहिला-बालकल्याण अशा सर्वच क्षेत्रात आपल्याला अमुलाग्र बदल घडवायचे आहेतअसे त्यांनी सांगितले.

माजी खासदार समीर भुजबळ पुढे म्हणाले कीनाशिक महापालिकेचा कारभार अवघ्या एका क्लिकवर आणायचा आहेघरबसल्या अर्ज आणि प्रमाणपत्र हे प्रत्यक्षात साकारायचे आहेरस्तेपाणीवीज यासारख्या जिव्हाळ्याच्या विषयांवर तक्रार करण्याची वेळ येऊ नये असे चित्र आपल्याला निर्माण करायचे आहेत्यासाठी आपल्या सर्वांची भक्कम साथ हवी आहेआगामी सिंहस्थ आणि नाशिकच्या विकासाची भरारी लक्षात घेऊन नाशिककर योग्य तो निर्णय घेतीलराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशिवसेना आणि रिपब्लिकन सेना युतीच्या उमेदवारांना येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानावेळी घड्याळ आणि धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करावेलवकरच आपण विजयी उमेदवारांसह प्रत्यक्ष कामाला सुरूवात करू याअसा ठाम विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

 

Comments

No comments yet.